असा दिसेल सर्वात स्वस्त iPhone; जुन्या मॉडेलची डिजाइन पुन्हा वापरणार Apple

Apple iPhone SE 4 गेल्या वर्षी पासून चर्चेचा विषय ठरला आहे. या अपकमिंग आयफोन संबंधित अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत. यातून फोनच्या संभाव्य फीचर्सची माहिती मिळाली आहे. तसेच डिवाइसच्या किंमतीची माहिती देखील मिळाली आहे. आता अनेक इमेज समोर आल्या आहेत, ज्यातून फोनची पहली झलक दिसली आहे.

iPhone 14 सारखी आहे डिजाइन

एका लीक रिपोर्टमधून, Apple iPhone SE 4 चे CAD रेंडर्स म्हणजे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत. या इमेज पाहता, फोनची डिजाइन iPhone 14 सारखी आहे. यात १४ प्रमाणे नॉच देण्यात आली आहे, ज्यात फेस आयडी सेन्सर आहे.

बॅक-पॅनलवर पाहता, यात सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा लुक जुन्या आयफोन एसई मॉडेल सारखाच आहे. यावेळी यात होम बटन देण्यात आलं नाही. यात यूएसबी टाईप-सी आणि अ‍ॅक्शन बटन मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे बटन फक्त आयफोन १५ च्या प्रो मॉडेलमध्ये मिळते.

लीक स्पेसिफिकेशन्स

अलीकडेच आलेल्या लीक्स व रिपोर्ट्स नुसार, आयफोन एसई ४ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले दिला जाईल. यात आयफोन १५ असलेला बायोनिक चिपसेट मिळू शकतो. तसेच, फोनमध्ये ४८एमपीचा कॅमेरा आणि दमदार बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.

कधी येईल बाजारात

आयफोन एसई ४ च्या लाँच किंवा किंमतीची कोणतीही ऑफिशियल माहिती मिळाली नाही, परंतु लीक्स व रिपोर्ट्स नुसार हा यावर्षीच्या शेवटी किंवा २०२५ च्या सुरुवातीला सादर केला जाईल. याची किंमत पण ४० ते ५० हजार दरम्यान ठेवली जाईल.

iPhone 16 सीरीज

iPhone SE 4 व्यतिरिक्त यावर्षी iPhone 16 सीरीज देखील लाँच करण्याची तयारी सुरू आहे. यासंबधित रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की या लाइन अप अंतगर्त प्लस, प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल देखील येतील. या सर्व आयफोनमध्ये अपग्रेडेड फीचर्स मिळू शकतात. यात दमदार बॅटरी दिली जाऊ शकते, जिचा बॅकअप जुन्या आयफोन १५ सीरीजमध्ये मिळणार्‍या बॅटरी पेक्षा जास्त असेल.

किंमत

आयफोन १६ सीरीज ची प्रारंभिक किंमत देखील १५ लाइनअप पेक्षा जास्त असेल. ही सीरिज अनेक कलर ऑप्शनमध्ये येऊ शकते.

Source link

appleapple iphone se 4iphone se 4अ‍ॅप्पलआयफोन
Comments (0)
Add Comment