मोका लागू होत नाही म्हणून आरोपींची सुटका (मोका डिस्चार्ज)
पुणे- मोका लागू होत नाही म्हणून आरोपींची सुटका झाली आहे. चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता परंतु तीनही आरोपींवर मोक्याची कारवाई केली गेली असून आवश्यक कागदपत्र नसल्यामुळे खटला भरला गेला नसल्याचे दिसून आले आहे.
यातून सद्यस्थिती मध्ये मोका कायदा लावणे ही साधारण बाब होतांना दिसत आहे, परंतु त्यामुळे सराईत गुन्हेगार नसणारे, निरपराध, चुकून गुन्ह्याच्या ठिकाणी हजर असणारे इत्यादी देखील मोक्यासारख्या कडक कायद्याच्या कचाट्यात अटकतांना दिसत आहेत.
आरोपी राहुल मुकेश सिंग, राज राहुल नगराळे आणि प्रसाद संतोष भोंडवे यांना मोक्यातून मुक्त करण्यात आले आहे परंतु कलमानुसार त्यांचा खटला चालणार आहे. सदर आरोपी यांच्या वतीने कामकाज वकील सुशांत तायडे, दिनेश जाधव, जितू जोशी, प्रज्ञा कांबळे आणि शुभांगी देवकुळे यांनी पाहिले.
कोट :गुन्हेगारांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे परंतु त्या सोबतच इतर कोणी निरपराधी व त्यांचा परिवार कायदा लागू होत नसताना शिक्षा तर भोगत नाही याचा देखील विचार करायला हवा. कलम लागू होत नसताना ही मोका कार्यवाही करणे मुळे कोर्टाचे कामकाज वाढते आणि जेल प्रशासनावर ही जवाबदारी वाढते.
सुशांत तायडे,
जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे