shiv sena and bjp: पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी द्यावा; शिवसेना नेत्याची मध्यस्थीची तयारी

हायलाइट्स:

  • शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी मध्यस्थी करण्याची वेळ आल्यास ती करणार- शिवसेना नेते अब्दुल सत्तार.
  • पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा यांनी पुढील ३ वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील असा शब्द दयावा- सत्तार
  • माझ्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा बाळगणे नक्कीच बरोबर आहे- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे.

औरंगाबाद:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या ‘भावी सहकारी’ असा विरोधी पक्षांच्या नेत्यांचा उल्लेख असलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप एकत्र येणार का?, किंवा भाजपचे मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार का?, या प्रश्नांभोवती राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यावर आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांबरोबर भाजप नेत्यांनी नेत्यांनी देखील मते मांडल्याने या मुद्द्यांवरील गोंधळ आणखीनच वाढला. आता तर शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वक्तव्याने या गोंधळात आणखीच भर पडली आहे. अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासमोरच केल्याने या चर्चेला अधिकच हवा मिळाली आहे. (shiv sena leader abdul sattar has said that pm modi should promise that uddhav thackeray will be the cm for the next three years)

शिवसेना नेते अब्दुल सत्तार एका वृतवाहिनीशी बोलत होते. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकत्र यावेत यासाठी आपण मध्यस्ती करणार का, असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. त्यावेळी सत्ता म्हणाले की मी मध्यस्थी करण्याइतका मोठा नाही. मात्र, मध्यस्थी करण्याची वेळ आली तर मध्यस्ती करू शकतो. मात्र यामध्ये माझे वैयक्तिक मत असे आहे की, सर्वात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शब्द द्यायला हवा. पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असा शब्द पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा असा शब्द त्यांनी दिला पाहिजे. तसे झाले तर दोन पक्ष नक्कीच एकत्र येतील असे अब्दुल सत्तार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘चंद्रकांत पाटील आमच्या तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असे ऐकले आहे’

मुख्यमंत्री माझ्याच पक्षाचा असे म्हणणे गैर नाही- रावसाहेब दानवे

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी देखील या चर्चेत असलेल्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दानवे म्हणाले की, माझ्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा हे शिवसेनेचे म्हणजे बरोबरच आहे. त्यात गैर काही नाही. ही अपेक्षा नक्कीच बरोबर आहे. आणि मलाही वाटते की माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा हे देखील बरोबरच आहे. मात्र यात किमान समान कार्यक्रम असायला हवा. जेव्हा जेव्हा आघाडीचे सरकार येते तेव्हा नेहमीच किमान समान कार्यक्रम आखावा लागतो, असे सूचक वक्तव्यही रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांच्या ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरून चर्चा; बाळासाहेब थोरात म्हणाले…
क्लिक करा आणि वाचा- चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवेंच्या शिवसेनेत येण्याच्या चर्चेबाबत जयंत पाटील म्हणाले…

Source link

Abdul Sattaramit shahcm uddhav thackerayPM Narendra ModiRaosaheb Danveअब्दुल सत्तारपंतप्रधान नरेंद्र मोदीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरावसाहेब दानवे
Comments (0)
Add Comment