अॅमेझॉनमुळे फेसबुक-इंस्टा बंद?
इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब, गुगल, स्नॅपचॅट आणि टिकटॉक बंद असल्याचे रिपोर्ट्स आले आहेत. त्यामुळे अॅमेझॉन वेब सर्व्हिस (AWS) डाउन असल्याची शंका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील युजर्सनी व्यक्ती केली आहे. हे सर्व प्लॅटफॉर्म्स अॅमेझॉनच्या सर्व्हिसवर मोठ्या प्रमाणावर अवलंबुन असल्यामुळे सर्व एकाच वेळी बंद पडत असल्याचं शंका व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी देखील Amazon Web Services क्रॅश झाल्यामुळे जगभरातील सोशल मीडिया बंद झाली होती.
हे देखील वाचा:
कधी झाली सुरुवात
रिपोर्टनुसार, मंगळवारी संध्याकाळी भारत आणि जगभरातील अनेक लोकेशनवर फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप बंद झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर युजर्सना लॉगिन करण्यास समस्या येत होती. तसेच अनेक युजर्सना पासवर्ड चेंज करण्यास सांगण्यात आलं आहे. तर काही युजर्सनी YouTube बंद असल्याचं देखील सांगितलं. सोशल मीडिया बंद पडल्याची माहिती सुमारे ८.३० वाजता मिळाली आहे. काहींना पुन्हा लॉगिन करण्या, फीड रिफ्रेश करण्याच्या सूचना स्क्रीनवर येत होत्या
हॅकिंगची शंका
आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरनुसार, मेटा प्लॅटफॉर्मचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाउन झाले होते. वेबसाइट आउटेजला ३००००० पेक्षा जास्त रिपोर्ट मिळाले आहेत, तर इंस्टाग्रामचे २०,००० पेक्षा जास्त रिपोर्ट मिळाले आहेत. तर डाउनडिटेक्टरवर व्हॉट्सअॅप आउटेजचे सुमारे २०० रिपोर्ट आले आहेत. सोशल मीडिया बंद पडल्यामुळे एक्स प्लॅटफॉर्मवर हॅकिंग हॅशटॅग ट्रेंड करत आहे. परंतु हॅकिंगच्या बातम्या नाकारल्या जात आहेत.
मेटानं काय म्हटलं?
मेटाचे स्पोकसपर्सन अँडी स्टोन यांनी एक्स सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये म्हटलं आहे की आम्हाला माहित आहे की आमची सर्व्हिस लोकांपर्यंत पोहचण्यास अडचणी येत आहेत. आम्ही यावर काम करत आहोत.