आधार होणार आता पीव्हीसी कार्डमध्ये कन्व्हर्ट; घरबसल्या करा अर्ज

UIDAI (Unique Identification Of India ) ने काही काळापूर्वी ‘PVC आधार कार्ड’ जारी करण्यास सुरुवात केली आहे. हवामान आणि आर्द्रतेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. तसेच,पाण्यात पडूनही हे खराब होत नाहीत.

काय आहे ‘पीव्हीसी कार्ड’

‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ ही UIDAI ने सुरू केलेली एक नवीन सेवा आहे जी आधारधारकांना नाममात्र शुल्क भरून त्यांचे आधार तपशील PVC कार्डवर प्रिंट करून घेण्याची सुविधा देते. ज्या रहिवाशांकडे रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक नाही ते पर्यायी मोबाइल क्रमांक वापरून ऑर्डर करू शकतात.
UIDAI आधार PVC कार्डसाठी, तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

सामान्य कार्ड होते लवकर खराब

आधार कार्ड हे पूर्वी लॅमिनेशन केलेले सामान्य कार्ड म्हणून वितरित केले जात होते. परंतु पर्समध्ये जास्त वेळ ठेवल्यास ते खराब होत होते. किंवा कधी कधी ते फाटतही असे. जर तुम्हीही अशा अनुभवातून गेले असाल तर आज तुम्हाला ‘वॉटरप्रूफ’ आणि ‘डॅमेजप्रूफ’ आधार कार्ड कसे बनवायचे याची माहिती इथे देत आहोत. वास्तविक, UIDAI ने काही काळापूर्वी PVC आधार कार्ड जारी करण्यास सुरुवात केली आहे. हवामान आणि आर्द्रतेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. पाण्यात पडूनही हे खराब होत नाहीत. तुम्हालाही तुमचे जुने आधारकार्ड पीव्हीसी कार्डमध्ये बदलायचे असेल तर त्यासाठीच्या सोप्या पायऱ्या याठिकाणी देत आहोत.

पीव्हीसी आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • पायरी १ – UIDAI वेबसाइटवर जा (URL UIDAI).
  • पायरी २- ‘माय आधार’ विभागात ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ वर क्लिक करा.
  • पायरीं ३ -तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी EID टाका.
  • पायरी ४ – सुरक्षा कोड किंवा कॅप्चा प्रविष्ट करा.
  • पायरी ५ – ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.
  • पायरी ६- तुमच्या नोंदणीकृत (रजिस्टर्ड ) मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  • पायरी ७ – OTP एंटर करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
  • पायरी८ – PVC कार्डची प्रिव्हयु प्रत दिसेल.
  • पायरी ९- माहिती आणि ‘प्लेस ऑर्डर’ व्हेरिफाय करा.
  • पायरी १० – 50 रुपये भरा.

तुमचा अर्ज सबमिट केला जाईल आणि तुमच्या घरी पाठवला जाईल.

Source link

Aadhaar PVC cardorder Aadhaar PVC carduidaiwaterproof Aadhaar cardयूआयडीआय
Comments (0)
Add Comment