संचार साथी पोर्टल
‘संचार साथी पोर्टल’ मे 2023 मध्ये लाँच करण्यात आले होते. लाँच झाल्यापासून, युजर्सच्या तक्रारींनंतर सुमारे 10 दशलक्ष मोबाइल नंबर डिस्कनेक्ट केले गेले आहेत. या सुविधेत, युजर्स हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाइलबद्दल तक्रार करू शकतात. तुम्ही तो मोबाईल नंबर ब्लॉक आणि अनब्लॉक देखील करू शकता. आतापर्यंत सुमारे 1.4 दशलक्ष मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले आहेत, तर 7 लाख हँडसेट ट्रॅक करून राज्य सरकारला माहिती देण्यात आली आहे.
असे काम करेल ‘चक्षू’ पोर्टल
या पोर्टलच्या माध्यमातून फेक कॉल आणि मेसेज करून लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. केंद्रीय दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्री(यूनियन मिनिस्टर ऑफ कम्यूनिकेशन एंड इलेक्ट्रॉनिक्स एंड इन्फॉर्मेंशन) अश्विनी वैष्णव यांनी हे पोर्टल लाँच केले आहे. याचबरोबर दूरसंचार विभागाचे ‘डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म’ (DIP) देखील लाँच करण्यात आले आहे. त्याच्या मदतीने सायबर गुन्हे आणि बँकिंग फसवणूक रोखण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे.
फेक कॉल आणि एसएमएस बद्दल तक्रार करण्यास सक्षम
‘चक्षू’ ही अतिरिक्त नागरिक केंद्रीत सुविधा आहे, हि सुविधा ‘संचार साथी’ प्लॅटफॉर्मवर आधीच उपलब्ध आहे. या सुविधेत युजर्सना फेक कॉल, मेसेज आणि व्हॉट्सॲप चॅटबद्दल तक्रार करण्याचा ऑप्शन मिळेल. तसेच, बँक खाते अपडेट, केवायसी अपडेट, पेटीएम वॉलेट, नवीन सिम, गॅस कनेक्शन, वीज कनेक्शन यासह सर्व प्रकारच्या फसवणुकीची तक्रार याठिकाणी केली जाऊ शकते. याशिवाय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 वर सायबर आणि आर्थिक फसवणुकीची लोक तक्रार करू शकतात.