Portronics Ampbox 27K पावर बँकचे स्पेसिफिकेशन्स
ब्रँडची नवीन पावर बँक खूप कॉम्पॅक्ट डिजाइन करण्यात आली आहे. हिची जाडी २ इंच असून उंच ६ इंचांपेक्षा थोडी जास्त आहे. याचा अर्थ असा की ही खूप पोर्टेबल आहे आणि प्रवासात देखील तुम्ही तुमचे डिवाइस चार्ज करण्यासाठी ही सोबत बाळगू शकता. Ampbox 27K बनवण्यासाठी कंपनीनं हाय ग्रेड मटेरियलचा देखील वापर केला होता. यात २७०००० एमएएचची बॅटरी क्षमता आहे. तसेच कंपनीनं यात ६५वॉटचा आऊटपुट सपोर्ट दिला आहे. त्यामुळे ज्या डिवाइसमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे ते पटकन चार्ज होतील.
ही पावर बँक दोन डिवाइस दोन यूएसबी टाइप ए पोर्टच्या मदतीनं १८ वॉट स्पिडनं चार्ज करू शकते. तर पावर बँकमधील टाइप सी पोर्ट ६५ वॉट आऊटपूट देत. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर ही पावर बँक १२० मिनिटांत 65W Type-C PD पोर्टच्या माध्यमातून ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला लॅपटॉप चार्ज करू शकते.
Portronics Ambbox 27K वर एक बटन देण्यात आलं आहे जे दाबल्यावर एलईडी डिस्प्लेच्या माध्यमातून बॅटरी कपॅसिटी दिसू लागते. सुरक्षेसाठी यात कंपनीनं आयसी प्रोटेक्शन दिलं आहे, त्यामुळे ओव्हर चार्जिंग, ओव्हर डिसचार्जींग, ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किट पासून देखील ही सुरक्षित राहते.
Portronics Ampbox 27K ची किंमत
Portronics Ampbox 27K सध्या कंपनीच्या वेबसाइटवरून विकत घेता येईल. तसेच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील विक्री केली जात आहे आणि ऑफलाइन व ऑनलाइन स्टोर्सवर देखील ही पावर बँक उपलब्ध आहे. पोर्ट्रॉनिक्स अँपबॉक्स २७के ची किंमत ३,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे, ही लाँच ऑफर मधील किंमत आहे. कंपनी पावर बँकवर १२ महिन्यांची वॉरंटी देखील देत आहे.