झोमॅटोनंतर आता स्विगीही देणार ट्रेनमध्ये फूड डिलिव्हरी; जेवण पोहचेल थेट आपल्या ट्रेन सीटवर

झोमॅटोनंतर आता स्विगीनेही थेट रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी फूड डिलिव्हरी सर्व्हिस देण्यासाठी IRCTC सोबत अधिकृतपणे भागीदारी केली आहे. ही सेवा बेंगळुरू, भुवनेश्वर, विशाखापट्टणम आणि विजयवाडा येथे 12 मार्च 2024 पासून उपलब्ध होईल. ट्रेनमधून प्रवास करणारे लोक IRCTC ॲपद्वारे त्यांच्या सीटवरच जेवण मिळवू शकतात. ट्रेनमध्ये फूड डिलिव्हरी करताना अन्न गरम राहण्यासाठी स्विगी विशेष इन्सुलेटेड पिशव्या वापरणार आहे.

स्विगी वरून थेट ट्रेनमध्ये करा फुड ऑर्डर

ट्रेनमध्ये स्विगीच्या फूड डिलिव्हरी सर्व्हिस केवळ वैध (व्हॅलिड ) पीएनआर क्रमांक असलेल्या प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. तुम्हाला तुमचा पीएनआर क्रमांक आयआरसीटीसी ॲपमध्ये टाकावा लागेल आणि तुम्हाला ज्या स्टेशनवर त्यांची फुड डिलिव्हरी हवी असेल ते रेल्वे स्टेशन निवडा. त्यानंतर IRCTC ॲप त्या परिसरातील स्विगीचे सर्व पार्टनर रेस्टॉरंट दाखवेल.तुम्ही तुमच्या आवडीचे रेस्टॉरंट निवडू शकता आणि त्यानुसार ऑर्डर देऊ शकता. स्विगी डिलिव्हरी एजंटद्वारे अन्न थेट तुमच्या ट्रेनच्या सीटवर डिलीव्हर केले जाईल.

अन्न गरम व ताजे ठेवण्यासाठी विशेष तरतूद

स्विगीने असेही नमूद केले की, प्रवाशांना दिले जाणारे अन्न गरम आणि ताजे ठेवण्यासाठी ते इन्सुलेटेड बॅगमध्ये पॅक केले जाईल. कंपनी आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सना वेळेवर रेल्वे स्थानकावर पोहोचण्याची खात्री करण्यासाठी एक्सट्रॉ ट्रेनिंग देखील देईल.

ट्रेन फूड डिलिव्हरी साठी अजूनही आहेत ऑप्शन्स

ट्रेनमध्ये फूड डिलिव्हरी करणारे स्विगी हे एकमेव ॲप नाही. झोमॅटो हे देखील ट्रेनमध्ये थेट फूड डिलिव्हरी सर्व्हिस देणारे एक ॲप आहे. ही सर्व्हिस केवळ सिलेक्टिव्ह भागांमध्ये उपलब्ध असली तरी, स्विगी आणि झोमॅटोच्या पार्टनर रेस्टॉरंट्समुळे रेल्वे प्रवाशांना अनेक केटरिंग ऑप्शन मिळतात .Zomato आणि Swiggy या दोन्ही सेवांचा विस्तार येत्या काळात निश्चितपणे वाढेल. येत्या आठवड्यात भारतातील 59 अतिरिक्त स्टेशन्सवर फूड डिलिव्हरी सर्व्हिसचा विस्तार करण्याची योजना जाहीर करण्यात येणार आहे.

वेटिंग लिस्टमध्ये तिकीटधारकांनाही मिळणार त्यांच्या कोचमध्ये सर्व्हिस

या सर्व्हिसची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये तिकीट असलेल्या प्रवाशांनाही त्यांच्या कोचमध्ये जेवण मिळू शकते. Swiggy आणि Zomato व्यतिरिक्त, IRCTC कडे RailRestro, Dominos, Haldirams आणि इतर अनेक फूड पार्टनर्सची चेन आहे. प्रवासी यापैकी कोणतीही सेवा IRCTC ॲपवरून निवडू शकतात.

Source link

dominosirctcrailrestroswiggyzomato
Comments (0)
Add Comment