‘उल्लू’ ॲप सरकारच्या रडारवर, गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरून होणार गायब

सध्या घरोघरी लहान मुलांचा अतिरिक्त मोबाईल वापर हि एक समस्या बनली आहे. दिवसभर मुले फोनवर नेमके बघतात तरी काय यावर पळत ठेवणे आता पालकांसाठी मोठे आव्हानच झाले आहे. अशातच, बाल लैंगिकतेसंबंधित कन्टेन्ट असल्याची तक्रार दाखल करत NCPCR (नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स ) ने ‘उल्लू’ या ॲपविरोधात कारवाईची मागणी केली आहे. एनसीपीसीआरने ‘उल्लू’ ॲपविरोधात तक्रार दाखल केली आहे. ॲपमध्ये चुकीच्या कन्टेन्टसह मुलांचे आक्षेपाहर्य फोटो आणि व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ॲप वापरण्यासाठी केवायसीची आवश्यकता न ठेवल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

NCPCR ने ‘उल्लू’ ॲपविरोधात तक्रार दाखल केली आहे. NCPCR हि मुलांच्या हिताची काळजी घेते. एनसीपीसीआरचे म्हणणे आहे की, सरकारने ‘उल्लू’ ॲपची चौकशी करावी. तसेच ‘उल्लू’ ॲपवर कारवाई करावी. या ॲपच्या माध्यमातून चुकीचा मजकूर पोस्ट केला जात आहे, जो मुलांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ॲपच्या विरोधात लिहिलेले पत्र

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात अशा ॲप्सच्या विरोधात नियमन आणि धोरण प्रमाणपत्र (रेगुलेशन व पॉलिसी सर्टिफिकेशन) देण्यात यावे, असे म्हटले आहे.

ॲप iOS आणि Android वर उपलब्ध आहे

‘Ullu’ ॲप Google Play Store आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या ॲपद्वारे आक्षेपाहर्य फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यामध्ये लहान मुलांचे फोटो आणि व्हिडिओंचा समावेश आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे ॲप वापरण्यासाठी KYC (Know Your Customer) डीटेल्सची आवश्यकता ठेवलेली नाही. या ॲपद्वारे विशेषतः शाळकरी मुलांना लक्ष्य केले जात आहे. यात बाल लैंगिकता दाखवली जाते. असे NCPCR ने नमूद केले आहे.

ॲप डीलिस्टिंगची मागणी

अशा परिस्थितीत ‘उल्लू’ ॲपवर कठोर कारवाई करावी आणि ते गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावे, अशी मागणी एनसीपीसीआरने केली आहे. अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन झाल्यास, Google आणि iOS प्लॅटफॉर्मद्वारे कारवाई केली जाते आणि ॲप डीलिस्ट केले जाते. ॲप लिस्टमध्ये हे ॲप 17 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.

Source link

google play storeullu appullu app indiaउल्लू एपगुगल प्ले स्टोअरतक्रारमोबाईल वापर
Comments (0)
Add Comment