सोशल मीडिया व जॉब सर्च वेबसाइटवरून फसवणुक
हे गुन्हेगार अनेकदा सोशल मीडियावर किंवा ऑनलाइन जॉब सर्च वेबसाइटवर खोट्या जाहिराती टाकून लोकांना फसवतात, काहीवेळा ते समोरच्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवूनही फसवतात. जर तुम्ही यात अडकलात तर तुमचे पैसे तर तुम्ही गमवालाच पण सोबतच तुम्हाला कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमचे बँक खाते देखील बंद होऊ शकते. हे फसवणूक करणारे तुमच्यावर दबाव आणू शकतात आणि तुमचेच बँक खाते वापरून पैसे ट्रान्सफर करू शकतात. हा एक गंभीर गुन्हा आहे ज्यामुळे कायदेशीर खटले, आर्थिक नुकसान आणि तुरुंगवास होऊ शकतो.
हे स्कॅमर कसे करतात काम
हे स्कॅमर लोकांना अडकवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात, जसे की-
- ऑनलाइन जॉब सर्च वेबसाइटवर खोट्या जाहिराती देणे.
- सोशल मीडियावर मेसेज पाठवणे.
- कधी कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे.
जाणून घ्या स्कॅमची डिटेल प्रक्रिया
एकदा अडकल्यावर, पीडित व्यक्तीला त्यांच्या बँक खात्यात पैसे ॲड करायला सांगितले जाते. हा पैसा सहसा चोरी, ऑनलाइन फसवणूक किंवा कोणत्याही बेकायदेशीर कामातून कमावलेला असतो . त्यानंतर पीडित व्यक्तीला यातील काही रक्कम ‘त्यांच्या कष्टाने कमावलेली रक्कम’ म्हणून ठेवण्यास सांगितले जाते आणि उर्वरित रक्कम दुसऱ्या खात्यात पाठवण्यास सांगितले जाते. अशा प्रकारे व्यवहारांचे एक जाळे तयार केले जाते, ज्यामुळे हा काळा पैसा कुठून आला याचा शोध घेणे कठीण होऊन बसते.
काय होतो परिणाम
या सापळ्यात अडकलेले लोक नकळत गुन्हेगाराचे साथीदार बनतात आणि पकडले गेल्यास त्यांना दंड किंवा तुरुंगवासही होऊ शकतो. बँकेला त्यांच्या खात्यात संशयास्पद ॲक्टिव्हिटी आढळल्यास, त्यांची खाती बंद केली जाऊ शकतात किंवा गोठवली जाऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
स्कॅमपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिपा
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला कधीही पैसे स्वीकारू किंवा पाठवू नका.
खूप किफायतशीर वाटणाऱ्या ऑनलाइन नोकऱ्यांपासून सावध रहा.
तुमच्या बँक खात्याचे तपशील कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.
कोणत्याही संशयास्पद ॲक्टिव्हिटीची तात्काळ पोलिस आणि तुमच्या बँकेला तक्रार करा.