Samsung Galaxy M14 4G Price
सॅमसंग गॅलक्सी एम१४ ४जी स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये 4GB RAM + 64GB Storage देण्यात आली आहे ज्याचा रेट ८,४९९ रुपये आहे. तसेच फोनचा मोठा व्हेरिएंट 4GB RAM + 64GB Storageला सपोर्ट करतो ज्याची किंमत ११,४९९ रुपये आहे. हा नवीन सॅमसंग फोन अॅमेझॉनवर Arctic Blue आणि Sapphire Blue कलरमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
Samsung Galaxy M14 4G Specifications
सॅमसंग गॅलक्सी एम१४ ४जी फोन १९२० x १०८० पिक्सल रेजोल्यूशन असलेल्या ६.७ इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीनसह लाँच झाला आहे. हा पीएलएस एलसीडी पॅनल डिस्प्ले आहे जो ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर लाँच झाला आहे जो वनयुआय ५.१ सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी गॅलेक्सी एम१४ ४जी मध्ये एड्रेनो ६१९ जीपीयू आहे.
Samsung Galaxy M14 4G ६जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोनमध्ये ६जीबी वचुर्अल रॅम देखील देण्यात आला आहे जो फिजिकल रॅमसह मिळून १२जीबी रॅ ची ताकद देतो. तसेच सॅमसंगचा हा फोन १२८जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम१४ ४जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सल मेन सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर तसेच २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
पावर बॅकअप साठी सॅमसंग गॅलेक्सी एम१४ ४जी स्मार्टफोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी हा मोबाइल २५वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. Samsung Galaxy M14 4G फोनमध्ये ३.५एमएम हेडफोन जॅक, साइड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल ४जी वोएलटीई आणि ब्लूटूथ ५.२ सारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.