मीडिया रिपोर्टनुसार, अॅप्पल सध्या बाजारावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे, त्यामुळे स्मार्ट रिंग लोकप्रिय होईल का आणि स्मार्टवॉचला कमी त्रासदायक पर्याय म्हणून पाहता येईल का? तसेच स्मार्ट रिंग जास्त वेळ घालता येते त्यामुळे रिंग घालून झोपता देखील येतं, या बाबींचा विचार केला जात आहे.
अॅप्पल सध्या आपली वियरेबल लाइनअपचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. तसेच कंपनीनं बोटात घालता येईल असं एनएफसी सपोर्ट असलेल्या डिवाइसचे पेटंट कंपनीनं फाइल करत आहे. त्यामुळे लवकरच हे प्रोडक्ट बाजारात येण्याची शक्यता वाढली आहे.
ही बातमी तेव्हा आली जेव्हा सॅमसंगनं यंदाच्या दुसऱ्या Galaxy Unpacked इव्हेंटमधून Galaxy Ring सादर करण्याची घोषणा केली. हा इव्हेंट जुलैमध्ये आयोजित केला जाईल. कंपनीनं हा वियरेबल डिवाइस जानेवारीत झालेल्या अनपॅक इव्हेंटमधून टीज करण्यात आला होता.
गॅलेक्सी रिंग मध्ये ब्लड फ्लो मेजर करण्याची क्षमता मिळेल. तसेच यात ECG मॉनिटरिंग, स्लिप ट्रॅकिंग तसेच यात इतर डिवाइस कंट्रोल करण्याची क्षमता आहे देखील असेल. वायरलेस पेमेंट करण्याची क्षमता देखील यात मिळेल. हा डिवाइस वेगवेगळ्या साइजेस मध्ये येण्याची शक्यता आहे.
नव्या स्मार्ट रिंग कॅटेगरीची खरी सुरुवात Oura Ring मुळे झाली होती. २०१५ मध्ये फिनलंडमधील ऑरा या हेल्थ टेक्नॉलॉजी कंपनीनं हा डिवाइस आणला होता. जो हार्ट रेट, अॅक्टिव्हिटी, स्लिप इत्यादी डेटा गोळा करतो आणि ब्लूटूथ द्वारे Oura अॅपवर पाठवतो. या रिंगच्या थर्ड जनरेशमध्ये बॉडी टेम्परेचर आणि मेन्युस्ट्रल सायकल देखील मेजर करतो. याची बॅटरी सिंगल चार्जवर एक आठवडा चालेल. मार्च २०२२ मध्ये कंपनीनं घोषणा केली होती की कंपनीनं आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त युनिट्स विकले आहेत.