Vivo V30 Pro Price
विवो व्ही३० प्रो भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये ८जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेज मिळते ज्याची किंमत ४१,९९९ रुपये आहे. तर फोनचा मोठा व्हेरिएंट १२जीबी रॅमसह ५१२जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत ४६,९९९ रुपये आहे. हा विवो मोबाइल Andaman Blue आणि Classic Black कलरमध्ये १७ मार्चपासून सेलसाठी उपलब्ध होईल. तसेच HDFC आणि SBI बँक युजर फोनमध्ये १० टक्के सूट मिळवू शकतात.
हे देखील वाचा:
Vivo V30 Pro Specifications
कॅमेरा डिपार्टमेंट की पाहता विवो व्ही३० प्रोचा सेल्फी कॅमेराच याची मोठी खासियत आहे. कंपनीनं आपला नवीन मोबाइल ५० मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात आणला आहे. तर फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे जो ओआयएस फीचरसह येतो. त्याचबरोबर फोनमध्ये ५० मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच ५० मेगापिक्सलचा पोर्टरेट सेन्सर देण्यात आला आहे.
विवो व्ही३० प्रो स्मार्टफोनमध्ये २८०० × १२६० पिक्सल रिजोल्यूशन असलेला ६.७८ इंचाचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते तसेच २८००निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. पावर बॅकअपसाठी विवो व्ही३० प्रो ५जी फोनमध्ये दमदार ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी मोबाइलमध्ये ८०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे.
हा विवो अँड्रॉइड १४ आधारित फनटच ओएस १४ वर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ४नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी ८२०० ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो ३.१गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. Vivo V30 Pro 5G मध्ये १२जीबी रॅम देण्यात आला आहे. हा मोबाइल १२जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो जो फिजिकल रॅमसह मिळून २४जीबी रॅमची ताकद देतो. हा फोन ५१२जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.