Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला अद्भुत योगायोग, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार करा हे उपाय

महाशिवरात्र, शुक्रवार, ८ मार्च रोजी साजरा केली जाणार असून दरवर्षी माघ
महिन्याच्या कृष्ण चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो. पौराणिक मान्यतांनुसार महाशिवरात्रीच्या तिथीच्या दिवशी भगवान शिव आणि जगत जननी माता पार्वती यांचा विवाह झाला होता. यंदाच्या महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, सिद्धी योग आणि कुंभ राशीत सूर्य, शनी, बुध यांची युती होणार असून, जी अत्यंत शुभ मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला बनत असलेल्या शुभ योगात राशीनुसार उपाय केल्यास भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती देतील अशी मान्यता आहे. जाणून घेऊया महाशिवरात्रीला होत असलेल्या आश्चर्यकारक योगायोगानुसार प्रत्येक राशीने कोणते उपाय करावेत.

मेष राशी

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे मेष राशीच्या भाविकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कच्चे दूध, दही आणि धतुरा अर्पण करावा. तसेच शंभोशंकराची कर्पुर आरती करुन शिवाष्टकाचे पठण करावे.

वृषभ राशी

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे वृषभ राशीच्या भाविकांनी महाशिवरात्रीला उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच महादेवाला मोगऱ्याचे अत्तर, बेलपत्र आणि चंदन अर्पण करुन आरती करावी.

मिथुन राशी

मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, त्यामुळे मिथुन राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीला स्फटिक शिवलिंगाची पूजा करणे उत्तम आहे. स्फटिक शिवलिंग उपलब्ध नसल्यास शिवालयात पूजा करावी. शिवलिंगावर गुलाल, कुंकू, चंदन अर्पण केल्यानंतर सात पांढरी रुईची फुले अर्पण करावीत. यानंतर शिवस्तोत्राचे पठण करून आरती करावी.

कर्क राशी

चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे, त्यामुळे कर्क राशीच्या भाविकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कच्चे दूध आणि पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करावा. तसेच अष्टगंध आणि चंदन अर्पण करुन पांढऱ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य दाखवावा.

सिंह राशी

सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे, त्यामुळे सिंह राशीच्या भाविकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर फळांचा रस आणि साखर पाण्यात विरघळवून शिवलिंगाचा अभिषेक करावा. यासोबतच रूईची फुले आणि बेलपत्र अर्पण करावे.

कन्या राशी

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असून कन्या राशीच्या भाविकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक करावा. तसेच नैवेद्य बेलपत्रावर ठेवून, बेर, धतुरा आणि रूईची फुले अर्पण करावीत. तसेच ओम नमः शिवाय मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

तुळ राशी

तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे तुळ राशीच्या शिवभक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच भोलेनाथांना बेलपत्र, मोगरा, गुलाब, तांदूळ, चंदन अर्पण करावे. त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि तुपाच्या दिव्याने आरती करावी.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे वृश्चिक राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला मध आणि तूपाने अभिषेक करावा. त्यानंतर पाण्याने शिवलिंगाला शुद्धोदक स्नानं घालावी.लाल फुले आणि मसूर डाळ अर्पण करावी. ‘ॐ नागेश्वराय नम:’ मंत्राचा १०८ वेळा जप करून आरती करावी.

धनु राशी

धनु राशीचा स्वामी गुरू आहे, त्यामुळे धनु राशीच्या भाविकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. त्यानंतर पिवळी फुले आणि तूरडाळ अर्पण करावी.

मकर राशी

मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे, त्यामुळे मकर राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गव्हाने झाकून ठेवावे, त्यानंतर विधिवत पूजा करावी. त्यानंतर ‘ॐ अर्धनारीश् वराय नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा आणि त्यानंतर गरजूंना गहूदान करावे.

कुंभ राशी

कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या भाविकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा आणि भस्माचा त्रिपुंड लावावा. तसेच बैर, कमलगट्टा, गोकर्णची सात फुले तसेच पूजेशी संबंधित वस्तूंचे दान करावे.

मीन राशी

मीन राशीचा स्वामी गुरू आहे, त्यामुळे मीन राशीच्या भाविकांनी महाशिवरात्रीच्या रात्री पिंपळाखाली शिवलिंगाची पूजा करावी. तसेच शिवलिंगावर पिवळी फुले, हरभरा डाळ अर्पण करून ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

Source link

bhagwan shivamahadevmahashivratri 2024Mahashivratri 2024 Upayओम नमः शिवायभगवान शिवमहादेवमहाशिवरात्रीशंभोशंकराहर हर महादेव
Comments (0)
Add Comment