मुख्यमंत्र्यांच्या ‘भावी सहकारी’ वक्तव्यावरुन चर्चा; विखे पाटील म्हणाले काहीही चमत्कार होऊ शकतो…

हायलाइट्स:

  • एकत्रित आले तर भावी सहकारी: मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने तर्कवितर्क
  • राज्यात पुन्हा एकदा भाजप- शिवसेनेचे युतीचे संकेत
  • राधाकृष्ण विखे पाटील यांचा सूचक इशारा

अहमदनगरः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या ‘भावी सहकारी’ या वक्तव्यावर भाजपमधील बहुतांश नेते युती होणार हीच अपेक्षा ठेवून बोलत असल्याचे दिसते. माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe patil) यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो. केव्हाही काहीही चमत्कार होऊ शकतो,’ असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

विखे पाटील अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधानांवरून सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत. यासंबंधी विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही युतीच्या दृष्टीने सूचक वक्तव्य केले. मात्र, काँग्रेसवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपमधील काही नेते महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक आहेत, असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार झाले आहेत. अशी विधाने करून ते स्वत:चे आणखी अवमूल्यन करून घेत आहेत. लाचारपणे वागून सत्तेला टीकून आहेत. काँग्रेस पक्षाची आजची आवस्था पाहिली तर पक्षापेक्षा व्यक्तीचे हित अधिक पाहिले जात आहे. अशा नेत्यांनी मुंगेरीलालसारखी स्वप्ने पाहू नयेत,’ असेही विखे पाटील म्हणाले. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या वक्तव्यावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.

वाचाः उद्धव ठाकरेंनी ‘भावी सहकारी’ हा शब्दप्रयोग का वापरला?; संजय राऊत म्हणाले…

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील वक्तव्यासंबंधी विखे पाटील म्हणाले, ‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. सध्या महाविकास आघाडीची जी मोट बांधलेली आहे ती वैचारिक नव्हे तर सत्तेसाठी आहे. त्या उलट भाजप-सेना हे गेल्या पंचवीस वर्षांपासून वैचारिक दृष्टया एकत्र राहू काम करीत आहेत. सत्ता असली आणि नसली तरी ते एकत्र होते. ते पुन्हा एकत्र येत असतील तर आपण स्वागतच केले पाहिजे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेले हे विधान कोणत्या संदर्भाने केले, याची मला कल्पना नाही. त्यांचे ते व्यक्तीगत मतही असू शकते. असे असले तरी राजकारणात कुणीही कुणाचा कायमस्वरूपी शत्रू अगर मित्र राहू शकत नाही. त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो,’ असेही विखे पाटील म्हणाले.

वाचाः देशमुख- परब यांना ४० कोटींची लाच; सचिन वाझेचा जबाबात आरोप

Source link

BJP Shiv Sena alliancecm uddhav thackeraymaha vikas aghadiउद्धव ठाकरेभाजपमहाविकास आघाडीशिवसेना-भाजप युती
Comments (0)
Add Comment