तेज पोलीस टाइम्स – पुणे-परवेज शेख
Pune-कोंढवा पोलीस स्टेशन २ लॅपटॉप, कंपनीचा अत्यंत महत्त्वाचा डाटा असलेल्या २ हार्ड डिस्क व १ मोबाईल असा १०० टक्के मुद्देमाल केला जप्त.” दि. २३/०२/२०२४ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. मा. संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मा. मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे सहा पो. निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलीस अंमलदार यांनी दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरचा दाखल गुन्हा कोणीतरी माहितगार इसमानेच केला असावा त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे यातील आरोपी नामे रोशन शंकर सणस वय २३ वर्षे रा. मु. वेरुळी, पो. मांढरदेवी, ता. वाई, जि. सातारा यास ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल तपास करीत असताना त्यानेसदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन, त्याने चोरी करुन नेलेला एकुण ८७,०००/- रु. किंमतीचा माल त्यामध्ये दोन लॅपटॉप, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल व दोन संगणकाच्या हार्डडिस्क हा त्याचे राहते घरी लपवुन ठेवलेला असताना तो काढुन दिल्याने त्यास दाखल गुन्ह्याचेकामी अटक करण्यात आली आहे.
वरिल नमुद कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविण पवार, सह पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. आर. राजा, पोलीस उप-आयुक्त परि.०५, मा.गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, श्री.मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उप-निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, लवेश शिंदे, निलेश देसाई, पोलीस अंमलदार शाहीद शेख, संतोष बनसुडे, सुजित मदन, सुरज शुक्ला, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली.