हा एक स्मार्ट कॅमेरा कॅल्क्युलेटर आहे, जो फक्त फोटो वरून समीकरणे सोडवण्यास तुम्हाला मदत करू शकतो. त्यामुळे तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे कठीण प्रश्न देखील अगदी सहज सोडवू शकाल. तसेच उत्तर कसे आले याची माहिती देखील अॅपमध्ये दिली जाईल. हे अॅप स्टेप बाय स्टेप सोल्युशन देतं, त्यामुळे फक्त झटकन उत्तर मिळत नाही तर ते उत्तर कसं आलं याची सविस्तर माहिती मिळेल.
Google नं केलं होतं खरेदी
Google नं वर्ष २०२३ मार्च मध्ये Photomath App विकत घेतलं होतं. आणि आता हे अॅप Google च्या App पोर्टफोलियोमध्ये जोडण्यात आलं आहे. आता हे जगभरातील युजर्स सहज वापरू शकतील. Google Play Store वर हे App आहे. याच्या मदतीनं युजर्स गणिताचे प्रश्न सहज सोडवू शकतील. यात Algebra, Geometry, Trigonometry, Statistics आणि calculus सारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
कसं वापरायचं Photomath App?
Photomath app वापरणे खूप सोपं आहे. यासाठी युजर्सना गणिताच्या प्रश्नाचा फोटो क्लिक करावा लागेल. त्यानंतर अॅप पुढील काम करण्यास सुरुवात करेल आणि तुम्ही दिलेल्या प्रश्नाचे स्टेप बाय स्टेप उत्तर देईल. गुगलच्या शैक्षणिक पोर्टफोलियोचा विस्तार या अॅपच्या माध्यमातून झालं आहे.
विशेष म्हणजे Photomath app जगभरातील अनेकांना आवडलं आहे. गणिताचे प्रश्न सोडवण्याची ही पद्धत जगभरात अनेकांना आवडली आहे. विशेष म्हणजे हे अॅप क्रोशियामध्ये डेव्हलप करण्यात आलं आहे आणि वर्ष २०१४ मध्ये लाँच करण्यात आलं होतं. हे अॅप १०० मिलियन पेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे आणि याला ४.५ स्टार रेटिंग देण्यात आली आहे. हे अॅप फ्री आहे, परंतु तुम्ही पैसे देऊन प्लस व्हेरिएंट वापरू शकता. याचे नाव Photomath Plus आहे.