हे स्मार्टवॉच Amazon व Flipkart वर उपलब्ध आहे. हे वॉच काळ्या आणि हिरव्या रंगात येते आणि त्यात टायटॅनियम फिनिश बेझल्स, ॲल्युमिनियम फ्रेम आहे, ब्लूटूथ सिरीज v5.3 ला सपोर्ट करते.
क्रॉसबीटने आपले नवीन ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. त्याची सुरुवातीची किंमत 1,999 रुपये आहे. हे घड्याळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वरून खरेदी केले जाऊ शकते. घड्याळ काळ्या आणि हिरव्या रंगाच्या पर्यायांमध्ये येते. हे घड्याळ ब्लूटूथ सिरीज v5.3 ला सपोर्ट करते. हे रफ अँड टफ वापरासाठी डिझाइन केलेले आहे. तुम्हाला घड्याळात टायटॅनियम फिनिश बेझल्स मिळतील. तसेच यात ॲल्युमिनिअम फ्रेम देण्यात आल्या आहेत . धूळ, शॉक किंवा आर्द्रतेमुळे घड्याळ लवकर खराब होणार नाही, असा कंपनीचा दावा आहे.
काय आहेत फीचर्स
- क्रॉसबीटच्या नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.43 इंच HD AMOLED डिस्प्ले असेल.
- याला 466×466 पिक्सेल रिझोल्युशन दिले जाईल.
- घड्याळाचा मॅक्सिमम ब्राईटनेस 850 nits असेल.
मिळेल ७ दिवसांची बॅटरी लाइफ
या वॉचमध्ये प्रगत बायोसेन्सर चिपसेट आहे. कंपनीचा दावा आहे की, हा चिपसेट ब्लड प्रेशर, ब्लड ऑक्सिजन, झोपेचा पॅटर्न ट्रॅक करण्यास मदत करेल. तसेच हृदयाचे ठोकेही अचूकपणे मोजता येतील. एकूणच, घड्याळात अनेक हेल्थ फीचर्स उपलब्ध असतील. वॉचमध्ये अल्ट्रा-लाँग 320mAh बॅटरी असेल. यामुळे कंपनीचा दावा आहे की हे वॉच 7 दिवस सतत वापरले जाऊ शकते. तसेच, स्टँडबाय वेळ 30 दिवसांसाठी उपलब्ध असेल.
100 हून अधिक स्पोर्ट्स मोड उपलब्ध असतील
वॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड उपलब्ध असतील. यात सिंगल-चिप ब्लूटूथ सपोर्ट आहे. रिमोट कॅमेरा कंट्रोल, रिमोट म्युझिक प्लेबॅक, रिमाइंडर आणि ब्लूटूथ कॉलिंग सारखी फीचर्स घड्याळात उपलब्ध आहेत. यामध्ये हार्ट रेट, स्पो 2, ब्लडप्रेशर, स्लीप मॉनिटर, वुमन हेल्थ ट्रॅकिंग आणि पेडोमीटर ही हेल्थ फीचर्स देण्यात आली आहेत. घड्याळ 320mAh बॅटरीसह येते. तसेच व्हॉईस असिस्टंट, फाइंड माय फोन सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. घड्याळ IP68 रेटिंगसह येते.