Nokia C32 Price cut in India
कंपनीनं Nokia C32 स्मार्टफोन ८,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. ही किंमत फोनच्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तसेच, आता या फोनची किंमत १५०० रुपयांपेक्षा कमी झाली. हा आता ७,४९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल.
फोनची नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लाइव्ह करण्यात आली आहे. नोकियाचा हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये येतो. यात Chrcoal, Breezy Mint आणि Beach Pink कलर ऑप्शन मिळतात
Nokia C32 Specifications
फीचर्स पाहता, Nokia C32 फोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन ७२०×१६०० पिक्सल आहे. तसेच फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरसह आला आहे, त्याचबरोबर यात 4GB RAM व 64GB आणि 128GB स्टोरेजचे ऑप्शन मिळतात. हा फोन Android 13 वर चालतो.
कॅमेरा सेट अप
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर एक २ एमपीचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.
फोन चार्जिंग सपोर्ट
सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याची बॅटरी ५००० एमएएचची आहे, जी १०वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा फोन सिंगल चार्जवर ३ दिवस पर्यंत बॅटरी बॅकअप देतो.