mungantiwar criticizes sharad pawar: ‘शरद पवारांना मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही’; मुनगंटीवारांचे टीकास्त्र

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील वक्तव्यावरूनअध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची चर्चा.
  • यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची शरद पवार यांच्यावर टीका.
  • पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, जनताच त्यांच्यावर नाराज- मुनगंटीवार.

चंद्रपूर:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील वक्तव्यांचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे. (bjp leader sudhir mungantiwar criticizes sharad pawar over statement by cm uddhav thackeray)

सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपुरात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांच्यावरच जनता नाराज आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्हाला जनतेने निवडणुकीत नापास करून टाकलेले आहे. मात्र, असे झाल्यानंतरही तुम्ही दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवरील नाव खोडून स्वत:चे नाव टाकले आणि सत्ता आली, सत्ता आली असे सांगत आहात. आता जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा जनता तुमच्यावर नाराजी व्यक्त करेल, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी द्यावा; शिवसेना नेत्याची मध्यस्थीची तयारी

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला. भाजपने युती तोडली असे म्हणणे हे २१ व्या शतकातील आठवे आश्चर्य असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका जाहीर केली. यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा पुढे आला. शिवसेनेने ही बेईमानी केली आहे आणि ती अधिक काळ चालणार नाही, अशा शब्दांत जोरदार प्रहार करत मुनगंटीवार यांनी पुढील निवडणुकीत जनता त्यांची लक्तरे वेशीवर टांगेल असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘चंद्रकांत पाटील आमच्या तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असे ऐकले आहे’

शिवसेनेवर टीकेचे प्रहार करताना मुनगंटीवार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. सध्या राज्याच्या राजकारणात फक्त गंमत सुरू असून या राजकीय गमतीजमतींचा स्तर देखील खूपच खालावला आहे. भाजपचे आमदार फुटणार आहेत असे वक्तव्य यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेले आपण पाहिले आहे. मात्र भाजपने आव्हान देऊनही तसे काही झाले नाही. शिवसेनेचे हे वक्तव्य म्हणजे राजकारणीतील पीजे आहे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवेंच्या शिवसेनेत येण्याच्या चर्चेबाबत जयंत पाटील म्हणाले…

Source link

cm uddhav thackeraySharad Pawarsudhir mungantiwarमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशरद पवारसुधीर मुनगंटीवार
Comments (0)
Add Comment