येत आहे ‘Jio Pay Soundbox’; देणार Paytm, PhonePe आणि Google Pay ला टक्कर

आपण दुकानांमध्ये पेमेंट करतांना एका साउंडबॉक्स आवाजाद्वारे दुकान मालकाला कळवले जाते त्याला पेटीएम साउंडबॉक्स असे म्हणतात. व्हॉईस ओव्हरच्या मदतीने आर्थिक व्यवहाराशी संबंधित प्रत्येक माहिती युजर्सना दिली जाते. त्याच्या मदतीने, विक्रेता आणि प्राप्तकर्ता दोघांनाही खूप मदत मिळते. जे युजर्स स्मार्टफोन्स आणि ॲप्समध्ये कंफर्टेबल नाहीत त्यांच्यासाठी हे डिव्हाइस खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होत आहे. आता Jio देखील या संबंधित मार्केटमध्ये येण्याचा विचार करत आहे.

साउंडबॉक्स सोबत दुकानमालकांना ऑफर्स

जिओ पे ॲप आधीच बाजारात उपलब्ध आहे आणि आता साउंडबॉक्सच्या मदतीने कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जिओ साउंडबॉक्सची चाचणी सुरू झाली आहे आणि लवकरच तुम्हाला दुकानांमध्ये ते पाहता येईल. याचा अर्थ मुकेश अंबानी यांची थेट स्पर्धा पेटीएम,फोनपे आणि गुगल पेशी होणार आहे. कारण रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, या साउंडबॉक्स सोबत दुकानमालकांना मोठ्या ऑफर्सही दिल्या जातील.

स्पर्धकांच्या चिंतेत भर

जिओच्या या प्लॅननंतर इतर कंपन्यांची चिंता थोडी वाढू शकते. विशेषत: आधीच अडचणीत असलेल्या पेटीएमची. दरम्यान जिओने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

पेटीएमने ॲड केली हि सर्व्हिस

आपल्या साउंड बॉक्सला मार्केटमध्ये अनोखे बनवण्यासाठी पेटीएमने त्यात म्युझिक सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे दुकानदार काम नसतानाही त्यांची आवडती गाणी ऐकू शकतात.

जिओने नाही दिला दुजोरा

आत्तापर्यंत ‘jio pay soundbox’ वर फक्त लीकच समोर आले आहेत. जिओने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

८ हजारांच्या येऊ शकतो Qualcomm-Jio 5G phone

क्वॉलकॉम आगामी एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी आपल्या स्वस्त चिपसेटवर काम करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार चिपमेकर या एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी रिलायन्स जिओ सोबत चर्चा करत आहे. तसेच याबाबत इतर स्मार्टफोन निर्माता कंपन्यांना देखील विचारणा करण्यात आली आहे. आगामी ५जी स्मार्टफोन मध्ये SA-2Rx क्षमता मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे क्वॉलकॉम बजेट फोन्समध्ये २ अँटेना ५जी स्टॅन्डअलोन सोल्युशन देऊ शकेल. रिसीविंग अँटेना चारवरून दोन करून खर्च कमी करता येईल आणि त्यामुळे परफॉर्मन्सवर जास्त परिणाम होणार नाही, असं क्वॉलकॉमनं म्हटलं आहे.

Source link

jiorelianceupi marketजिओजिओ पे साउंडबॉक्सयुपीआय मार्केटरिलायन्स
Comments (0)
Add Comment