आज आम्ही तुम्हाला एका अॅप बाबत माहिती सांगणार आहोत, ज्याचे नाव सिक्योर फोल्डर आहे. या अॅपच्या मदतीनं तुम्ही कोणताही अॅप यात लपवून ठेवू शकता. पासवर्ड द्वारे सुरक्षित असलेल्या जागेत अॅप्स लपवण्याची सर्वात सोपी पद्धत सिक्योर फोल्डर आहे. इथे तुमचे अॅप्स, फोटो, व्हिडीओ आणि डॉक्यूमेंट देखील सुरक्षित ठेवता येतील.
हे देखील वाचा:
पासवर्ड सेट करा
सिक्योर फोल्डर अॅपमध्ये तुम्ही एक पासवर्ड सेट करू शकता. त्यानंतर फक्त तुम्हीच तो पासवर्ड वापरून ते अॅप्स अॅक्सेस करू शकाल. ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला बस काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर तुम्ही तुमच्या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये अॅप्स लपवता येतील. चला जाणून घेऊया कोणती पद्धत आहे.
- सर्वप्रथम Settings ओपन करा आणि त्यानंतर Security and privacy वर टॅप करा.
- इथे More security settings ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर Secure Folder वर टॅप करा.
- त्यानंतर पुढे जाण्यासाठी Continue वर क्लिक करा.
- त्यानंतर पुन्हा Continue वर क्लिक करा.
- इथे Secure Folder क्रिएट होण्याची वाट पाहा आणि त्यानंतर Done वर क्लिक करा.
- मग Secure Folder साठी पिन, पासवर्ड किंवा पॅटर्न सेट करा.
- पुढे जाण्यासाठी Next वर क्लिक करा आणि तुमचा सिक्योर फोल्डर पासवर्ड टाका.
- त्यानंतर “+” आयकॉन वर टॅप करा आणि ते अॅप्स निवडा जे तुम्हाला सिक्योर फोल्डरमध्ये ठेवायचे आहेत.
- त्यानंतर Add वर क्लिक करा.
अशाप्रकारे तुम्हाला जे अॅप्स इतरांपासून लपवून ठेवायचे आहेत ते सहज लपवता येतील. इथून अॅप्स अनहाइड देखील करता येतील आणि पुन्हा अॅप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये दिसू लागतील.