महाशिवरात्रीच्या दिवशी ‘शैतान’ची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा अधिक कमाई

मुंबई– अजय देवगण आणि आर माधवन यांच्या ‘शैतान’ या सिनेमाने काल पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी, ८ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला महाशिवरात्रीच्या सुट्टीचा फायदा झाला. विशेष म्हणजे रिलीज होण्यापूर्वीच, चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १.७६ लाखांहून अधिक तिकिटे विकून ४.१४ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट १०-१२ कोटींहून अधिक कमाई करेल, असा अंदाज बांधला जात होता. पण पहिल्याच दिवशी या चित्रपटाने यापेक्षा जास्त कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

अजय देवगण एअरपोर्टवर स्पॉट

विकास बहल दिग्दर्शित ‘शैतान’ हा एक सुपरनॅचरल हॉरर-थ्रिलर आहे. ट्रेलर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत होती. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी आर माधवन आणि जानकी बोदीवाला यांच्या अभिनयाचे कौतुक केले. याचा परिणाम सिनेमाच्या कमाईवरही दिसून आला. शुक्रवारी मॉर्निंग शोमध्ये ‘शैतान’साठी १४ टक्के प्रेक्षकांनी उपस्थिती लावली, तर रात्रीच्या शोमध्ये ही संख्या ४३% वर पोहचलेली.

‘शैतान’ने पहिल्या दिवशी १४.२० कोटींची कमाई केली

sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘शैतान’ने पहिल्या दिवशी देशात १४.२० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. तर जगभरात २१.९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘शैतान’ हा अजय देवगणचा परदेशातील रिलीज झालेला सर्वात मोठा सिनेमा ठरला. परदेशात १२०० हून अधिक स्क्रीनवर तो प्रदर्शित झाला आहे. याचा फायदाही चित्रपटाला झाला आहे. पहिल्याच दिवशी परदेशात शैतानने ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अर्जुन सोडून प्रतापने रविराजला बनवलं आपला वकील, सुभेदारांच्या घरात सायलीचा पावलोपावली अपमान

दृश्यम २ ला गाठू शकला नाही शैतान

‘शैतान’ची कमाई आश्चर्यकारक आहे कारण याआधी देशात हॉरर प्रकारातील कोणत्याही चित्रपटाला इतकी चांगली सुरुवात मिळाली नव्हकी. लॉकडाऊननंतर रिलीज झालेल्या अजय देवगणच्या चित्रपटांपैकी ‘दृश्यम २’ सोडल्यास ‘रनवे ३४, ‘थँक गॉड’ आणि ‘भोला’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे ‘शैतान’च्या कमाईचा आकडा अभिनेता आणि त्याच्या चाहत्यांसाठी सुखद आहे. ‘दृश्यम २’च्या पहिल्या दिवसाची कमाई १५.३८ कोटी झाली होती. त्यामुळे त्या कमाईच्या तुलनेत शैतान नक्कीच मागे पडला आहे. पण या ठिकाणी दोन्ही चित्रपटांचे जॉनर वेगळे आहेत. तसेच हा सिक्वेल चित्रपट नाही त्यामुळे कमाईत तफावत होऊ शकते.

‘शैतानचे बजेट वीकेंडला सरप्राईज देऊ शकते

बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’समोर सध्या कोणतीही मोठी स्पर्धा नाही. ‘आर्टिकल 370’ आणि ‘लापता लेडीज’चे कौतुक होत आहे, पण हे दोन्ही चित्रपट फारशी कमाई करत नाहीत. त्यामुळे ‘शैतान’ला बक्कळ कमाई करण्याची संधी आहे. हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये अधिक कमाई करून सर्वांना चकित करू शकतो यात शंका नाही. मात्र त्याची खरी कसोटी सोमवारपासून सुरू होणार आहे. चित्रपटाचे बजेट ६०-६५ कोटी रुपये होते. चित्रपटाने कमाईचा वेग कायम ठेवला तर तो २०२४ चा पहिला हिंदी सुपरहिट चित्रपट ठरू शकतो.

इंडस्ट्रीत मॅटर्निटी लिव्ह देण्याची पद्धतच नाही,अदिती सारंगधरने व्यक्त केली खंत

‘शैतान’ची कथा आणि कलाकार

अजय देवगण आणि आर माधवन व्यतिरिक्त ‘शैतान’मध्ये ज्योतिका आणि जानकी बोदीवाला यांच्याही भूमिका आहेत. हा २०२३ मध्ये आलेल्या गुजराती हॉरर चित्रपट ‘वश’चा रिमेक आहे. चित्रपटाची कथा एका फार्महाऊसवर सुट्टीवर गेलेल्या कुटुंबाची आहे, ज्याच्या घरी एक अनोळखी व्यक्ती काही काळ भेट देते, परंतु नंतर ती जायचे नाव घेत नाही. त्यानंतर ती अनोळखी व्यक्ती त्या कुटुंबातील मुलीला आपल्या काळ्या जादूने जाळ्यात ओढतो.

Source link

ajay devganr madhvanshaitaan movieshaitaan movie box office collectionshaitaan movie box office reportअजय देवगणआर माधवनबॉक्स ऑफिसमहाशिवरात्रीशैतान
Comments (0)
Add Comment