Samsung नं आणला 6000mAh बॅटरी असलेला नवीन 5G फोन, मिळेल 50MP चा मेन कॅमेरा, दिसतो जबरदस्त

Samsung चा नवीन फोन लाँच झाला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट फोन गॅलेक्सी M सीरीज मध्ये आला आहे. याचे नाव Samsung Galaxy M15 5G आहे. हा फोन अनेक दमदार फीचर्ससह आला आहे. यात तुम्हाला 90Hz रिफ्रेश रेट व्यतिरिक्त पावरफुल प्रोसेसर आणि 50MP चा कॅमेरा मिळेल. फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगनं हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. याची किंमत अद्याप सांगण्यात आलेली नाही. परंतु स्पेसिफिकेशन्स मात्र समोर आले आहेत, चला ते पाहू.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनी या फोनमध्ये ६.५ इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले ऑफर करत आहे. फोनमधील हा डिस्प्ले ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले ८०० निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. सॅमसंगनं हा फोन ४जीबी रॅम आणि १२८जीबी सह लाँच केला आहे. गरज पडल्यास फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं १टीबी पर्यंत वाढवता येते. कंपनीनं फोन मधील प्रोसेसरचे नाव सांगितले नाही, परंतु स्पेक्स देण्यात आला आहे. हे मात्र कन्फर्म करण्यात आलं आहे की फोन ऑक्टा-कोर चिपसेटसह आला आहे.

अंदाज लावला जात आहे की फोन मधील प्रोसेसरचे नाव मीडियाटेक डायमेंसिटी ६१००+ असू शकते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरा देण्यात आले आहेत. यात ५० मेगापिक्सलच्या मेन कॅमेऱ्यासह एक ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि एक २ मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तसेच, सेल्फीसाठी फोनमध्ये कंपनी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ६००० एमएएची आहे. ही बॅटरी २५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओएस पाहता फोन अँड्रॉईड १४ वर चालतो. या फोनला कंपनी चार मोठे ओएस अपडेट आणि ५ वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट देईल. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ३.५ मिमी हेडफोन जॅक, वाय-फाय आणि ब्लूटूथसह अनेक स्टँडर्ड ऑप्शन देण्यात आले आहेत. फोन तीन कलर ऑप्शन- लाइट ब्लू, डार्क ब्लू आणि ग्रे मध्ये येतो. कंपनीनं हा फोन मध्य पूर्व आशिया मध्ये लाँच केला आहे. लवकरच हा भारतात देखील येईल अशी अपेक्षा आहे.

Source link

galaxy m15 5gsamsungsamsung galaxy m15 5gगॅलेक्सी एम१५ ५जीसॅमसंगसॅमसंग गॅलेक्सी एम१५ ५जी
Comments (0)
Add Comment