‘लापता लेडीज’ची बजेटपेक्षा दुप्पट कमाई तर ‘शैतान’नं तीन दिवसांत कमावले तब्बल इतके कोटी

मुंबई: बॉक्स ऑफिसवर सध्या समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. बिग बजेट सिनेमांसोबतच कमी बजेट सिनेमांनाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. बॉक्स ऑफिसवर सध्या ‘शैतान’हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसतोय. तर ‘लापता लेडीज’ सिनेमानं देखील बजेटच्या तुलनेत दुप्पट कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.

किरण राव हिनं दिग्दर्शित केलेला सिनेमा ‘लापता लेडीज’ प्रेक्षकांना आवडतोय. हलका फुलका विनोदी सिनेमा केवळ पाच कोटींच्या बजेटमध्ये तयार झालाय. सध्याच्या सिनेमांचं बजेट पाहता हा आकडा कमी असल्याचं दिसून येतं. त्यामुळं या लो बजेट सिनेमाच्या कमाईची चर्चाही होतेय, कारम या सिनेमानं आता १० कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.

Oscars 2024 : ओपनहायमरचा ऑस्करमध्ये दबदबा,सर्वोत्कृष्ट चित्रपटासह ७ पुरस्कार; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
तर दुसरीकडं अजय देवगण आणि आर माधवन यांचा ‘शैतान’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसतोय. अजय आणि माधवन यांची जादू अशी काही चालली आहे की, या सिनेमानं केवळ तीन दिवसांतच तब्बल ५० कोटींच्या वर गल्ला जमवला आहे.

अजय देवगण आणि आर माधवनचा ‘शैतान’ गुजराती सिनेमाचा रिमेक आहे. ‘वश’ या गुजराती सिनेमाचा रिमेक असला तरी या सिनेमाला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे.

प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सिनेमानं १४.७५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं १८.७५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर तिसऱ्या दिवशी सिनेमानं तब्बल २० कोटींची कमाई केली. त्यामुळं तीन दिवसांतच सिनेमानं ५० कोटींचा आकडा पार केलाय. आता या आठवड्यात सरुवातीला कमाईत घसरण होण्याची शक्यता आहे. पण विकेंडला मात्र हा तोटा सिनेमा भरून काढणार असं म्हटलं जात आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे.

अजय देवगणपेक्षा आर माधवन ठरला वरचढ? , ‘शैतान’ पाहिल्यावर नेटकरी म्हणाले…

शैतान सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, काळ्या जादूच्या अंधारमय प्रदेशात डोकावणारा आहे सिनेमा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कबीर आणि त्याच्या कुटुंबाबरोबर वेगळ्या प्रवासाला घेऊन जातो. त्यांच्या या आनंददायी प्रवासात एका रहस्यमयी अनोळखी व्यक्तीमुळं नेमकं काय घडतं, आणि त्यांचा पुढचा प्रवास या सिनेमात पाहायला मिळतो.

Source link

ajay devgn and r madhavanlaapataa ladieslaapataa ladies box office collectionlaapataa ladies vs shaitanshaitanshaitan box office collectionshaitan movie collectionshaitan vs laapataa ladies box office collectionलापता लेडीजशैतान
Comments (0)
Add Comment