एअरटेलच्या नवीन योजना
एअरटेलच्या नवीन प्लॅनची किंमत ६९९ आणि ९९९ रुपये आहे. दोन्हीमध्ये, 1TB पर्यंत डेटा अनुक्रमे 40Mbps आणि 100Mbps वेगाने उपलब्ध आहे. जर डेटा मर्यादा वेळेपूर्वी संपली तर डेटाचा वेग देखील कमी होईल.आता दोन्ही नवीन प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 4K Android बॉक्ससह 350 हून अधिक थेट टीव्ही चॅनेल, Airtel Extreme Play आणि Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
नाही भरावे लागणार इन्स्टॉलेशन चार्जेस
एअरटेलच्या मते, नवीन एक्सट्रीम एअरफायबर प्लॅन सहा महिने आणि एक वर्षासाठी खरेदी करता येतील. चांगली गोष्ट म्हणजे आता ग्राहकांना यासाठी इन्स्टॉलेशन चार्जेस द्यावे लागणार नाहीत. नोएडा आणि गाझियाबादच्या युजर्ससाठी ही सेवा उपलब्ध आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते बुक केले जाऊ शकते.
799 रुपयांच्या प्लॅनचे डीटेल्स
वर नमूद केलेल्या दोन प्लॅन्सपूर्वी, एअरटेलने 799 रुपये किंमतीचा एक्स्ट्रीम एअर फायबर प्लान सादर केला होता. या पॅकमध्ये 1TB FUP मर्यादेसह 100Mbps च्या वेगाने डेटा दिला जात आहे. मर्यादा गाठल्यास, डेटा गती कमी होईल. याशिवाय प्लानमध्ये लाईव्ह चॅनेल आणि ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस दिला जात आहे. हा प्लॅन 6 महिने आणि एक वर्षासाठी सबस्क्राइब करता येतो.
3 नवीन रोमिंग पॅक
एअरटेलने अलीकडेच 3 नवीन रोमिंग पॅक सादर केले आहेत. त्यांची किंमत 195, 295 आणि 595 रुपये आहे. या तीन प्लॅनमध्ये 1GB पर्यंत डेटा दिला जात आहे. तसेच, नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये 100 मिनिटे आउटगोइंग कॉल आणि 100 SMS उपलब्ध आहेत. हे पॅक अधिकृत वेबसाइटवर जाऊन रिचार्ज केले जाऊ शकतात.
डिस्ने हॉटस्टारचे फ्री सब्स्क्रिप्शन
‘डिस्ने हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक आकर्षक शोज व फिल्म्सचे ऑब्शन्स उपलब्ध आहेत. एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये हे सब्स्क्रिप्शन फ्री मिळत आहे. एअरटेलच्या या प्लॅनअंतर्गत 3 महिन्यांचे फ्री सब्स्क्रिप्शन, डेली 3G डेटा व कॉलिंग देखील मिळेल.