मेसेजमध्ये दावा केला जात आहे की लिंकवर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही या ऑफरसाठी पात्र व्हाल. परंतु सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे. कारण जिओ आणि मुकेश अंबानी यांच्याकडून अशी कोणतीही ऑफर दिली जात नाही. हो कारण जर तुम्हाला देखील असा एखादा मेसेज मिळाला असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे.
फॅक्ट चेकमध्ये हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं उघड झालं आहे. जिओ कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही की अनंत अंबानी यांच्या लग्नात अशी एखादी ऑफर दिली जाईल. त्यामुळे जर तुमच्याकडे देखील असा कोणताही मेसेज आला असेल तर तुम्ही सावध व्हा. तसेच कोणतीही थर्ड पार्ट लिंक ओपन केली नाही पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
जर तुम्हाला देखील असा एखादा मेसेज आल्यास तुम्हाला सर्वप्रथम त्याच्याकडे दुर्लक्ष करा. कारण जर तुम्ही अश्या मेसेजला रिप्लाय दिला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. याच्या मदतीनं स्कॅमर्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये VPN अॅप्स इंस्टॉल करत आहेत. या अॅपमुळे युजर्सचं अकाऊंट देखील हॅक करतात आणि त्यामुळे बँक अकाऊंटपासून इतर सर्व माहिती मिळवली जाते.
येत आहे ‘Jio Pay Soundbox’
आधीच बाजारात जिओ पे ॲप उपलब्ध आहे. त्यामुळे कंपनी आपला व्यवसाय आता साउंडबॉक्सच्या मदतीने वाढवण्यावर भर देत आहे. लवकरच तुम्हाला दुकानांमध्ये ते पाहता येईल कारण जिओ साउंडबॉक्सची चाचणी सुरू झाली आहे, असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पेटीएम,फोनपे आणि गुगल पेशी मुकेश अंबानी यांची थेट स्पर्धा होणार आहे. दुकानमालकांना ऑफर्सही या साउंडबॉक्स सोबत मोठ्या दिल्या जातील.