दोघात तिसरा तर नाही ना? असं करा WhatsApp वर चेक, ‘या’ लेबल द्वारे मिळेल माहिती

लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp साठी प्रायव्हसी कायम महत्वाची ठरली आहे. म्हणूनच युजर्सना सांगितलं जातं की त्यांचे मेसेज एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड आहेत. या इन्क्रिप्शनचा अर्थ असा की फक्त मेसेज पाठवणारा आणि रिसिव्ह करणारा ते वाचू शकतो आणि स्वतः व्हॉट्सअ‍ॅप देखील हे मेसेजेस वाचू शकत नाही. आता नवीन लेबलच्या मदतीनं युजर्सना सांगितलं जाईल की त्यांचे चॅट्स कधी एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड आहेत.

नवीन रिपोर्टमध्ये समोर आलं आहे की व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना लवकरच चॅट विंडो मधेच लेबल दाखवून सांगितलं जाईल की कधी त्यांचे चॅट्स पूर्णपणे एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड आहेत. या फीचरची टेस्टिंग जानेवारीपासून केली जात होती आणि आता बीटा टेस्टर्ससाठी हे रोलआउट केलं जात आहे. स्पष्ट झालं आहे की पुढील काही आठवड्यात सर्व युजर्सना हे फिचर दिलं जाईल.

चॅट विंडोमध्ये दिसेल छोटासा मेसेज

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स आणि फीचर्सची सर्वात आधी माहिती देणाऱ्या प्लॅटफॉर्म WABeta नं सांगितलं आहे की नवीन फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी रोलआउट करण्यात आलं आहे. या फीचरच्या मदतीनं युजर्सना चॅट विंडो मध्ये एक लेबल मेसेज दाखवला जाईल आणि सांगितलं जाईल की चॅट एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड आहे. रिपोर्टनुसार हा लेबल काही काळ दिसेल तिथे जिथे आता Last Seen दिसतं.

या मेसेजमुळे युजर्सना विश्वास होईल की प्लॅटफॉर्मवर त्यांचे चॅट्स पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि इतर कोणीही हे वाचू शकत नाही. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की जानेवारीमध्ये अनाउंस करण्यात आलेल्या या फीचरचा फायदा या महिन्याच्या अखेरपर्यंत अनेक युजर्सना मिळेल.

नवीन लेबलची गरज का पडली?

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच थर्ड-पार्टी चॅट्सचा ऑप्शन देखील युजर्सना मिळणार आहे. याचा अर्थ असा की व्हॉट्सअ‍ॅपवरूनच टेलीग्राम आणि सिग्नल सारखे इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर देखील मेसेज पाठवले जातील आणि सर्व चॅट्स एंड-टू-एंड इन्क्रिप्शन ऑफर करत नाहीत. त्यामुळे चॅट ओपन करताच युजर्सना समजेल कधी हे इन्क्रिप्शन ऑफर केलं जात आहे आणि कधी नाही.

Source link

End To End Encryption LableWhatsAppWhatsApp End To End EncryptionWhatsApp updateव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप अपडेट
Comments (0)
Add Comment