कॉल रेकॉर्डिंग करून देखील समोरच्याला कळणार नाही; Nothing स्मार्टफोन्समध्ये मिळणार जबरदस्त फिचर

Nothing नं एक नवीन फिचर रोलआऊट केलं आहे, ज्यामुळे आता गुपचूप फोन कॉल रेकॉर्ड करता येतील. म्हणजे आता तुम्ही कॉल रेकॉर्ड करत आहात हे समोरच्या व्यक्तीला अजिबात समजणार नाही. या फिचरमुळे बराच फायदा होणार असाल तरी याचा गैरवापर करू नका असा सल्ला दिला जात आहे. हे फिचर वापरण्यासाठी नवीन विजेटची मदत घेता येईल. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.

नथिंग फोनवर कॉल रेकॉर्डिंग

नथिंगचे सहसंस्थापक कार्ल पे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून या नवीन कॉल रेकॉर्डिंग फिचरची घोषणा केली. या फीचरमुळे नथिंग फोन युजर्स गुपचूप कॉल रेकॉर्ड करू शकतील, ज्यात नथिंग फोन १, नथिंग फोन २ आणि नथिंग फोन २ए चा समावेश करण्यात आला आहे.
हे देखील वाचा: Nothing Phone 2a नवीन ट्रान्सपरंट लुक आणि 32MP सेल्फी कॅमेऱ्यासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

युजर्स या फिचरचा वापर नथिंग फोनवरील नवीन रेकॉर्डर विजेटच्या माध्यमातून करू शकतील. या फिचरची मागणी मोठ्याप्रमाणावर करण्यात आल्याची माहिती कार्ल यांनी दिली आहे. याआधी कॉल रेकॉर्डिंगसाठी नथिंग फोनवर गुगल डायलरवरील रेकॉर्डिंग ऑप्शनचा वापर करावा लागत होता. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला कॉल रेकॉर्डिंगचा अलर्ट जात असे.

Nothing Phone 2a चे स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone 2a स्मार्टफोन ६.७ इंचाचाचा FHD+ OLED डिस्प्लेसह बाजारात आला आहे. यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १३०० निट्स पीक ब्राइटनेस मिळते. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं MediaTek Dimensity 7200 Pro चिपसेटचा वापर केला आहे. सोबत 12GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. 8GB व्हर्च्युअल RAM मुळे एकूण 20GB RAM ची पावर मिळते.

हा डिवाइस अँड्रॉइड १४ आधारित नथिंग ओएस २.५ वर चालतो. फोन जास्त हीट होऊ नये म्हणून यात अ‍ॅडव्हान्स लिक्विड कूलिंग सिस्टम मिळते. ज्यामुळे गेमिंग सेशन दरम्यान फोन गरम होत नाही. या फोनमध्ये ३ अँड्रॉइड अपडेट आणि ४ वर्ष सिक्योरिटी पॅच अपडेट मिळतील.

फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ओआयएससह ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा आणि ५० एमपीचा अल्ट्रा-वाइड सेन्सर मिळतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ३२ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. यातील ५००० एमएएचची ४५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Source link

mobilesnewsNothingnothing phone 2aनथिंग फोन
Comments (0)
Add Comment