‘नासा’ने इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो
नासाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘गुरु’वरील लाल डाग सहज दिसू शकतो. ‘नासा’च्या म्हणण्यानुसार, ‘जूनो’ अंतराळयानाने 13,917 किलोमीटर अंतरावरून हा फोटो काढला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा लाल डाग हे एक वादळ आहे, जे गेल्या 350 वर्षांपासून ‘गुरू’वर तयार होत आहे.
‘नासा’च्या प्रतिमेमध्ये ग्रेट रेड स्पॉट दिसू शकतो. त्यात तपकिरी, नारंगी सर्पाचा आकारही दिसतो. नासाचे म्हणणे आहे की, ‘गुरू’ ग्रहाच्या वातावरणातील उच्च दाबाचा प्रदेश 350 वर्षांहून अधिक काळ अँटीसायक्लोनिक वादळे निर्माण करत आहे.
वादळ होत आहे लहान
1979 मध्ये याबद्दल पहिल्यांदा माहिती मिळाली. ‘व्हॉएजर’ अंतराळयानाने हा लाल डाग पाहिला.तेव्हापासून हे वादळ लहान होत चालले आहे. त्याची उंची आणि रुंदी दोन्हीमध्ये घट दिसून आली आहे. ग्रेट रेड स्पॉटचा आकार पृथ्वीच्या दुप्पट आहे. हे वादळ गुरूच्या ढगांच्या खाली सुमारे 300 किमी आहे. गुरु ग्रहावर ठोस जमीन नसल्यामुळे वादळ कमकुवत होत नाहीये. येथे ताशी ६४३ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, ‘जूनो’ स्पेसक्राफ्ट 2011 मध्ये लाँच करण्यात आले होते. हे अंतराळयान बास्केटबॉल कोर्टाइतके मोठे आहे. 4 जुलै 2016 रोजी याने गुरूच्या कक्षेत प्रवेश केला होता .
‘NASA’ ने ISS वरून घेतला पृथ्वीवरील गोठलेल्या समुद्राच्या पाण्याचा दुर्मिळ फोटो
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर असलेले अंतराळवीर अनेकदा पृथ्वीचे कधीही न पाहिलेले दृश्य कॅप्चर करतात जे सोशल मीडियावर शेअर केल्यावर लोक मंत्रमुग्ध होतात. ‘NASA’ ने ISS वरून नुकतीच कॅप्चर केलेली प्रतिमा शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले कि, “गोठलेल्या समुद्राच्या पाण्याचे चमकदार प्रदर्शन” दर्शविते. 3 फेब्रुवारी 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून गोठलेल्या समुद्राच्या पाण्याचे चमकदार प्रदर्शन कॅप्चर करण्यात आले होते, असे ‘NASA’ ने लिहिले आहे.