…म्हणून मला माजी मंत्री म्हणू नका असं म्हणालो; चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

हायलाइट्स:

  • चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन चर्चा
  • माजी मंत्री म्हणू नको वक्तव्यावरुन खळबळ
  • अखेर चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा

पुणेः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, दोन दिवसांत चित्र बदलेल. त्यामुळं मला माजी मंत्री म्हणू नका, असं वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आलं होतं. आता मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ते विधान का केलं होतं याचा खुलासा केला आहे.

पुण्यात कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री या विधानाबाबतही भाष्य केलं आहे. ‘देहू इथल्या एका सलूनच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो, तिथे घोषणा सुरू होती की माजी मंत्री यांनी पुढे यावे, त्यावर मी म्हणाले की अरे माजी काय म्हणतो चार दिवसांनी ते आजी होतील,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचाः ‘संजय राऊतांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडी स्थापन झाली’‘मला माजी मंत्री म्हणू नका याची क्लिप चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आली. माजी मंत्री म्हणू नका हे दुसऱ्या नेत्यासाठी होतं. तसंच, माझ्या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली. पण माझा असा कोणताही हेतू नव्हता. आता सामाजिक जीवनामध्ये एकदा तुमच्या नावाने बील लागलं की एकामागून एक घटना घडत असतात,’ असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?; शिवसेनेचा सवाल

जयंत पाटील आणि फडणवीस यांनी शनिवारी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, राजकारण राजकारणाच्या जागेवर असतं. शहादा सारख्या लहान गावात ते एकत्र गेले अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसंच आपल्याला कोणी राज्यपाल करतंय, कोणी केंद्रीय मंत्री करतंय, यामुळे मला खूप बरं वाटतंय असंही त्यांनी सांगितलं.

वाचाः साताराः आसले गावच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

Source link

bjpchandrakant patilchandrakant patil latest newschandrakant patil news updateचंद्रकांत पाटील
Comments (0)
Add Comment