काय आहे eSIM
eSIM बद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. eSIM हे डिजिटल सिमसारखे असतात, जे लोकांच्या फोनमध्ये साठवले जातात. हे फिजिकल सिमप्रमाणेच काम करते. सेवा प्रदात्याने दिलेला QR कोड स्कॅन करून eSIM डिव्हाइसमध्ये जोडला जाऊ शकतो.हे तंत्रज्ञान स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे आणि ते मोबाइल फोनमधून फीजिकल सिम कार्ड स्लॉट काढून टाकत आहेत.
सिम स्वॅपर्स करत आहेत टेकनॉलॉजीचा गैरवापर
अहवालात असे म्हटले आहे की सिम स्वॅपर्सने ईएसआयएम तंत्रज्ञानाचा भंग करण्यास सुरुवात केली आहे आणि ते लोकांचे फोन नंबर, बँक तपशील इत्यादींमध्ये प्रवेश करू शकतात.हल्लेखोर चोरलेली किंवा लीक झालेली क्रेडेन्शियल्स वापरून युजर्सची मोबाइल खाती हायजॅक करतात आणि नंतर QR कोड तयार करून मोबाइल नंबर त्यांच्या डिव्हाइसवर ट्रान्सफर करतात. या प्रक्रियेदरम्यान, पीडित व्यक्तीचा मोबाइल नंबर हायजॅक होतो आणि ई-सिम निष्क्रिय केले जाते.
गुन्हेगार करतात युजर्सच्या बँक व इतर सेर्व्हीसेसमध्ये प्रवेश
एकदा त्यांनी मोबाईल फोन नंबरवर प्रवेश मिळवला की, गुन्हेगार युजर्सच्या बँका आणि मेसेजिंग ॲप्ससह अनेक सेवांमध्ये प्रवेश करू शकतात आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन देखील बायपास करू शकतात. असे करून ते युजर्सच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करू शकतात.
अशा प्रकारे करा स्वतःचे रक्षण
eSIM स्वॅपिंग हल्ले टाळण्यासाठी, युजर्सनी युनिक पासवर्ड वापरावे. जर तुम्ही तुमच्या फोनवर ई-बँकिंग सेवा वापरत असाल तर त्या खात्याची सुरक्षा कडेकोट ठेवली पाहिजे. तुम्ही तुमचे डीटेल्स कोणाशीही शेअर करू नये आणि तुम्हाला धोका वाटत असेल तर तुम्ही लगेच पासवर्ड बदलावा.