आता वाट पाहावी लागणार नाही, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय तो बघेल चटकन; WhatsApp चं नवीन फीचर येतंय

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मेसेजिंग अ‍ॅपमध्ये २४ तासांसाठी स्टेटस अपडेट करण्याचा पर्याय मिळतो. अनेकदा युजर्स एखाद्या खास व्यक्तीसाठी स्टेटल ठेवतात आणि त्यानं पाहावं याची वाट पाहतात. त्यामुळे अ‍ॅप मध्ये आता एक नवीन फीचर येत आहे. ज्यामुळे अशी वाट पाहावी लागणार नाही आणि स्टेटसमध्ये कोणालाही मेंशन करता येईल.

गेले अनेक दिवस या फीचरवर काम सुरु होतं आणि आता हे बीटा व्हर्जन मध्ये येईल. नवीन फीचरसह युजर्सना स्टेटस अपडेटमध्ये एखाद्या कॉन्टॅक्टला मेंशन किंवा टॅग करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ज्यामुळे ज्या युजरला स्टेटसमध्ये मेंशन केलं जाईल त्याला याची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून देखील मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅपवर Status Mention

सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या फीचर्स आणि अपडेट्सची माहिती देणाऱ्या WABetaInfo वेबसाइटनं सांगितलं आहे की नवीन फीचर WhatsApp Android २.२४.६.१९ बीटा अपडेटमध्ये देण्यात येईल. हे फीचर बीटा टेस्टर्सना त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणत्याही युजरला स्टेटस मध्ये मेंशन करू देईल आणि याचे नाव Status Mention असं सांगण्यात आलं आहे.

एखाद्या कॉन्टॅक्टला स्टेटसमध्ये मेंशन केल्यावर तशीच नोटिफिकेशन मिळेल जशी एखादा मेसेज आल्यावर मिळते. त्यामुळे त्यांना इतर स्टेटस बघण्याची गरज नाही आणि स्टेटस अपलोड करणाऱ्याला त्या व्यक्तीने स्टेटस पाहिलं की नाही याची वाट पाहावी लागणार नाही.

पुढील काही आठवड्यात मिळेल अपडेट

सध्या फक्त अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये टेस्टर्सना या फीचरचा अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे आणि बीटा टेस्टिंग नंतरचा स्टेबल अपडेटमध्ये याचा समावेश केला जाईल. त्यामुळे सर्व युजर्सना काही आठवडे या फिचरसाठी वाट पाहावी लागू शकते.

प्रोफाइल फोटोचा स्क्रीन शॉट काढण्यावर बंदी

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या बीटा व्हर्जन २.२४.४.२५ च्या माध्यमातून अँड्रॉइडसाठी एक नवीन फिचर घेऊन येत आहे. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपनं व्यू वन्स मोडमध्ये शेयर करण्यात आलेल्या इमेजेसचा स्क्रीन शॉट घेण्याचा पर्याय बंद केल्यानंतर आता हा नवीन बदल येत आहे.

Source link

status mention on whatsappWhatsAppwhatsapp status mentionव्हॉट्सअॅपव्हॉट्सअॅप स्टेटस
Comments (0)
Add Comment