Samsung Galaxy A35 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नवीन Samsung 5G Phone भारतात लाँच झाला आहे ज्याचे नाव Galaxy A35 5G आहे. कंपनीनं हा ३० हजार रुपयांची रेंज मध्ये सादर केला आहे जो Premium Glass पॅनलवर बनला आहे तसेच खूप रिच लुक देतो. या फोनची विक्री भारतात सुरु झाली आहे तसेच जर तुम्हाला देखील हा बजेट सॅमसंग स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ‘गॅलेक्सी ए३५ ५जी‘ एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. फोनची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy A35 5G ची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी फोन ८जीबी रॅमवर लाँच करण्यात आला आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत ३०,९९९ रुपये आहे. तसेच फोनचा मोठा व्हेरिएंट २५६जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि ज्याची किंमत ३३,९९९ रुपये आहे. हा सॅमसंग फोन Awesome Ice Blue, Awesome Navy आणि Awesome Lilac अश्या तीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे IDFC, OneCard Bank Credit Card तसेच HDFC Bank Credit/Debit Card चा वापर केल्यास ३,००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
हे देखील वाचा: EMI वर देखील घेता येणार नाही ‘हा’ iPhone; फक्त खास लोकांसाठी नवी डिजाइन

Samsung Galaxy A35 5G Specifications

सॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी फोन १०८० x २३४० पिक्सल रेजोल्यूशन असलेल्या ६.६ इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाइल असलेली ही स्क्रीन सुपर अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. डिस्प्लेवर १०००निट्स ब्राइटनेस मिळते.

Galaxy A35 5G मध्ये सॅमसंगचा एक्सिनॉस १३८० चिपसेट आहे सोबत ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली-जी६८ जीपीयू देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी फोन ८जीबी रॅमसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये १२८जीबी स्टोरेज तसेच २५६जीबी मेमरीचे दोन ऑप्शन मिळतात. तसेच ही स्टोरेज १टीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डने वाढविता येते.

गॅलेक्सी ए३५ ५जी फोन ५,०००एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये २५वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर या फोनमध्ये २३ तास इंटरनेट वापरता येते तसेच २६ तास व्हिडीओ प्लेबॅक टाइम किंवा ८३ तास म्यूजिक प्लेबॅक टाइम मिळू शकतो.

फोटोग्राफीसाठी हा सॅमसंग फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/१.८ अपर्चर असलेला ५० मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) फीचरसह आला आहे. त्याचबरोबर बॅक कॅमेरा सेटअपमध्ये एफ/२.२ अपर्चर असलेला ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/२.४ अपर्चर असलेली ५ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. तसेच Samsung Galaxy A35 5G १३ मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एफ/२.२ अपर्चरवर चालतो.

Galaxy A35 5G फोन अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टमवर लाँच करण्यात आला आहे जो वनयुआयसह चालतो. तसेच कंपनी या फोनवर ४ जेनरेशन अँड्रॉइड ओएस अपग्रेड तसेच ५ वर्ष सिक्योरिटी अपडेट देणार आहे. म्हणजे हा फोन अँड्रॉइड १८ वर अपडेट होईल. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये १२ 5G Bands, NFC, Bluetooth 5.3 आणि 5GHz Wi-Fi असे ऑप्शन मिळतात. तसेच यात Smart Switch आणि Samsung Knox Vault असे कंपनीचे सिग्नेचर फीचर देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी Side Fingerprint Sensor चा वापर करण्यात आला.

Source link

galaxy a35 5gsamsungsamsung galaxy a35 5gSamsung Galaxy A35 5G PriceSamsung Galaxy A35 5G Specification
Comments (0)
Add Comment