आजकाल बहुतेक भारतीय ओळखपत्र म्हणून आधार कार्ड वापरत आहेत. आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लोकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन केले होते. ‘UIDAI’ म्हणते की, ”लोकांना ओळखीचा पुरावा (POI) आणि पत्त्याचा पुरावा (POA) व्हेरीफाय करावा लागेल. मोफत आधार कार्ड अपडेटची सुविधा फक्त ‘myAadhar’ पोर्टलवर उपलब्ध असेल. सीएससी केंद्रात जाऊन ५० रुपये शुल्क भरूनही हे काम करता येईल.
करू शकता ऑनलाइन अर्ज
आधार कार्डमधील पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला ‘myAadhaar’ पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या प्रक्रियेत तुम्हाला काही समस्या आल्यास, तुम्ही ऑफलाइन देखील तपशील अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जावे लागेल.
या स्टेप्स करा फॉलो
- आधार स्वयंसेवा अपडेट पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्या.
- तुमचा आधार क्रमांक टाइप करा आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा.
- तुमच्या समोर अनेक ऑप्शन असलेले एक पेज उघडेल, तुम्हाला ‘ऑनलाइन अपडेट सर्व्हिसेस’ वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर आधार ऑनलाइन अपडेट करा. येथे तुम्ही नाव, पत्ता इत्यादी बदल करू शकता.
- ‘Proceed to Update Aadhaar’ वर क्लिक करा.
- तुमच्या समोर एक नवीन विंडो येईल. येथे क्लिक करून तुम्ही नाव आणि पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया करू शकता.
- ‘पत्ता’ वर क्लिक करून पुढे जा.आता तुमच्या समोर दिसणाऱ्या विंडोमध्ये तुमचा सध्याचा पत्ता असेल. विंडोच्या तळाशी गेल्यावर तुम्हाला नवीन पत्त्याचे डीटेल्स भरण्याचा ऑप्शन मिळेल.
- पत्ता अपडेट करण्यासाठी, तुम्हाला एक व्हॅलिड सपोर्ट डॉक्युमेंट प्रदान करावा लागेल. यामध्ये मतदार ओळखपत्र, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा ओळखपत्र यांपैकी कुठलेही एक दस्ताऐवज सादर करू शकता. मॅन्युअली किंवा डिजीलॉकरद्वारे हे अपलोड केले जाऊ शकतात.
- त्याचप्रमाणे, पुढील सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल आणि पैसे भरण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
आधार अपडेटची विनंती स्वीकारली गेल्यानंतर तुम्हाला 14 अंकी URN मिळेल. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे स्टेट्स चेक करू शकाल.