AI चॅटबॉट
रेल्वे तिकीट बुकिंग सुलभ करण्यासाठी IRCTC अनेक पद्धतींचा अवलंब करते. याच अनुषंगाने आता नवीन पद्धत अवलंबली जात आहे. त्याच्या मदतीने तुम्हाला ट्रेनचे तिकीट बुक करणे सोपे होईल. भारतीय रेल्वेने एक नवीन AI चॅटबॉट सादर केला आहे. त्याला ‘AskDisha 2.0’ असे नाव देण्यात आले आहे. एवढेच नाही तर याच्या मदतीने तुम्ही अनेक कामे सहज करू शकाल आणि त्यामुळे तुम्हाला खूप मदतही होऊ शकते.
काय आहे ‘AskDisha 2.0’
हा एक प्रकारचा AI चॅटबॉट आहे जो प्रत्येक युजरला खुप उपयोगी ठरतो. याला डिजिटल इंटरॅक्शन (डिजिटल संवाद) म्हणून देखील ओळखले जाते. हे फीचर कोणालाही सहजपणे मदत मागण्याची मुभा देते आणि यांच्याकडे प्रत्येकासाठी उत्तरे आहेत. एआय आणि मशीन लर्निंगवर आधारित चॅटबॉट अतिशय विचारपूर्वक डिझाइन केले गेले आहे. तुम्ही हिंदी, इंग्रजी आणि हिंग्लिश (हिंदी आणि इंग्लिश एकत्र ) भाषांमध्येही मदत मागू शकता. म्हणजेच हा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरणार आहे.
सोप्या कमांड्स
रेल्वे तिकीट बुक करताना तुम्ही याचा वापर करू शकता. तिकीट बुकिंग, पीएनआर स्टेट्स तपासणे, तिकीट रद्द करणे अशा इतर अनेक सोप्या कमांड्स (आदेशां) मुळे तुमचे काम सोपे होईल.
AskDisha 2.0 द्वारे या सेवांना केला जातो सपोर्ट
- तिकीट बुकिंग
- पीएनआर स्टेटस चेक
- तिकीट कॅन्स्लेशन
- रिफंड स्टेट्स
- बोर्डिंग स्टेशन चेंज
- बुकिंग हिस्टरी चेक
- ई-तिकीट व्ह्यू
- डाउनलोड ERS
- ई-तिकीट प्रिंट आणि शेअर
‘AskDisha 2.0’ मध्ये कसा करायचा प्रवेश
- ‘AskDisha 2.0’ IRCTC च्या वेबसाइटवर तसेच मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे.
- त्यात प्रवेश करण्यासाठी, अधिकृत IRCTC वेबसाइट उघडा.
- होमपेजच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात ‘AskDisha 2.0’ लोगो पहा.
- आवश्यक डीटेल्स एंटर करा किंवा खाली दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये तुमची क्वेरी (समस्या) टाइप करणे सुरू करा.
- तुमची कमांड बोलण्यासाठी तुम्ही ‘मायक्रोफोन’ चिन्हावर देखील क्लिक करू शकता.
- तुमच्या फोनवर ‘AskDisha 2.0’ वापरण्यासाठी, तुमच्या स्मार्टफोनवर ‘IRCTC Rail Connect’ ॲप डाउनलोड करा.
- ‘AskDisha 2.0’ आयकॉन शोधा आणि तुमची क्वेरी टाइप करणे किंवा बोलणे सुरू करा.