हा बदल व्हिडीओ टूलबॉक्समध्ये स्क्रीन बंद करून व्हिडीओ साउंड सुरु ठेवण्याचं फीचर आणि गेम टूलबॉक्समध्ये स्क्रीन बंद करण्याचं फीचर हटवण्यात आलं आहे. हे ओव्हर-द-एअर अर्थात ओटीए सॉफ्टवेयर अपडेटच्या माध्यमातून होईल. त्यामुळे जर हे फीचर तुमच्या डिव्हाइसवर चालत नसेल तर हा कोणतीही बग नाही तर कंपनीनं मुद्दाम केलेला बदल आहे.
हे देखील वाचा:
कंपनीनं का घेतला हा निर्णय?
कंपनीनं सांगितलं आहे की, हा निर्णय गुगलच्या नियमांचे पालन करण्यासाठी घेण्यात आला आहे. बॅकग्राउंड मध्ये YouTube व्हिडीओ चालू ठेवण्याची क्षमता युट्युब प्रीमियम सब्सक्रिप्शनसह येते अनेक बेनिफिट्स पैकी एक आहे. त्यामुळे थर्ड-पार्टी डिवाइस आणि सॉफ्टवेयर फीचर्स आहेत जो युजर्सना पेमेंटविना हे फीचर्स वापरू देतात. त्यामुळे गुगल आता अनेक टूल आणि फीचर्स बंद करत आहे.
शाओमीनं देखील या निर्णयामागे नियमांचे पालन हे कारण देऊन ही सुविधा हटवली आहे. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की गुगलमुळेच कंपनीनं हा निर्णय घेतला असावा. कारण असं केल्यामुळे गुगलच्या पेड सब्सस्क्रिप्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे याआधी युट्युबनं जाहिराती स्किप करणं कठीण केलं आहे आणि जाहिरात ब्लॉकर्स युजर्ससाठी व्हिडीओ प्लेबॅक स्लो केला आहे. या सर्व गोष्टींमुळे युट्युब आणि गुगल युजर्सना प्रीमियम सब्सक्रिप्शनसाठी पेमेंट करण्यास भाग पडत आहे. असाच निर्णय ओप्पोने जानेवारीमध्ये घेतला होता.
Xiaomi च्या कोणत्या फोन्सवर होणार परिणाम
शाओमीच्या या निर्णयाचा परिणाम MIUI 12, MIUI 13, MIUI 14 आणि नवीन आलेल्या हायपरओएसवरील सर्व स्मार्टफोनवर होईल. यात Xiaomi 14, Xiaomi 13, Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 12T सारख्या नवीन फ्लॅगशिपचा देखील समावेश आहे.