तुम्ही इन्स्टाग्रामवर एखाद्याला टाळत असाल किंवा फक्त कामावर लक्ष केंद्रित करू इच्छित असाल आणि मित्राने शेअर केलेल्या मीममुळे तुम्हाला त्रास नको असेल तर Instagram मध्ये एक फीचर आहे जे या परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते. इंस्ट्राग्राम आता युजर्सना Instagram वर ऑफलाइन दिसण्याची परवानगी देते. हे फीचर तुम्हाला प्रायव्हसी देते. अनैच्छिक मेसेज टाळण्यास मदत करते आणि युजर्सना त्यांच्या ऑनलाइन उपस्थितीवर कंट्रोल घेऊ देते.
अँड्रॉइड आणि आयओएस उपकरणांवर इंस्टाग्रामवर ऑनलाइन स्टेटस कसे लपवाल
मोबाईल ब्राउझरवर इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह स्टेटस कसे बंद करावे / लपवावे
लॅपटॉपवर स्टेटस कसे बंद करावे
अँड्रॉइड आणि आयओएस उपकरणांवर इंस्टाग्रामवर ऑनलाइन स्टेटस कसे लपवाल
तुम्ही तुमची इंस्टाग्राम ॲक्टिव्हिटी प्रायव्हेट ठेवू इच्छित असल्यास, तुमचे ऑनलाइन स्टेट्स लपवणे ही एक स्मार्ट ट्रिक आहे.
Android आणि iOS युजर्ससाठी येथे एक साधे मार्गदर्शक आहे:
- Instagram ॲप उघडा.
- तळाशी उजव्या कोपऱ्यात असलेल्या तुमच्या प्रोफाइल चित्रावर टॅप करा.
- ‘मेसेज आणि स्टोरी रिप्लाय’ वर टॅप करा.
- ‘व्हू कॅन सी यू आर ऑनलाइन’ अंतर्गत, तुम्हाला ‘ॲक्टिव्ह स्टेटस दाखवा’ दिसेल.
- तो टॉगल बंद करा.
मोबाईल ब्राउझरवर इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह स्टेटस कसे बंद करावे / लपवावे
तुम्ही मोबाईल ब्राउझरवर Instagram वापरत आहात? काळजी नाही. तुम्ही अजूनही ॲक्टिव्ह स्टेटस लपवू शकतात.
- तुमच्या मोबाईल ब्राउझरवर Instagram उघडा.
- तळाशी उजवीकडे प्रोफाइल चिन्हावर टॅप करा.
- वरती डावीकडे ‘गियर’ चिन्हावर टॅप करा.
- ‘मेसेज आणि स्टोरी रिप्लाय’ वर टॅप करा.
- ‘व्हू कॅन सी यू आर ऑनलाइन’ अंतर्गत, तुम्हाला ‘ॲक्टिव्हिटी स्टेटस दाखवा’ दिसेल.
- ‘ॲक्टिव्ह स्टेटस दाखवा’ टॉगल बंद करा.
लॅपटॉपवर स्टेटस कसे बंद करावे
तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर इन्स्टाग्राम सर्फिंग करता का? तरीही तुम्ही तुमचे ॲक्टिव्ह स्टेटस सहज लपवू शकता.
- तुमच्या वेब ब्राउझरवर Instagram उघडा.
- उजवीकडे वरच्या बाजूला प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा.
- ‘व्ह्यू आर्किव्ह’ च्या पुढील ‘सेटिंग्ज’ वर क्लिक करा.
- ‘सेफ्टी अँड प्रायव्हसी’ निवडा.
- खाली स्क्रोल करा आणि ‘मेसेज व स्टोरी आन्सर ‘ निवडा.
- ‘ॲक्टिव्ह स्टेटस दाखवा’ वर क्लिक करा
- तो टॉगल बंद करा.