हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ४१३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ८ हजार ३२६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्येत नगण्य वाढ झाली झाली असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत तुलनेने अधिक आहे आहे. शिवाय मृत्यूची संख्याही घटली आहे. या बरोबरच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४१३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ३९१ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ८ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार ८४१ इतकी होती. तर, आज ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ८० इतकी होती. (maharashtra registered 3413 new cases in a day with 8326 patients recovered and 49 deaths today)
आज राज्यात झालेल्या ४९ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ३६ हजार ८८७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१६ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- somaiya live: महालक्ष्मी एक्स्प्रेस ठाणे स्थानकात पोहोचली, कार्यकर्त्यांची गर्दी
एकूण सक्रिय रुग्णांच्या तुलनेत घट
राज्यात एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत ती ४२ हजार ९९५ वर आली आहे. काल एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ९१९ इतकी होती. ही स्थिती दिलासादायक आहे.
क्लिक करा आणि वाचा- किरीट सोमय्या स्थानबद्ध; देवेंद्र फडणवीस यांनी केला राज्य सरकारचा निषेध
२,८१,५६१ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७० लाख २८ हजार ४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख २१ हजार ९१५ (११.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८१ हजार ५६१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ७५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा- मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी अटकेचे आदेश; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर आरोप