टेलिकॉम ऑपरेटर व्होडाफोन-आयडियाने एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन 169 रुपयांचा आहे. ही प्री-पेड रिचार्ज योजना आहे. हा प्लान डेटा, कॉलिंग आणि OTT सबस्क्रिप्शनसह येतो. ‘Vi’ च्या 169 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह एकूण 8GB डेटा दिला जात आहे.
काय आहेत प्लॅनचे फीचर्स
या प्लॅनमध्ये कोणतेही डेली डेटा लिमिट्स नाही. याचा अर्थ, जर युजर्सना हवे असेल तर ते एका दिवसात एकूण 8 जीबी डेटा देखील वापरू शकतात. किंवा तुम्हाला हवे असल्यास 8 GB डेटा संपूर्ण आठवड्यासाठीही वापरता येईल. हा प्लान 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. या परवडणाऱ्या प्लॅनमध्ये मोफत OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. या अंतर्गत युजर्सना 90 दिवसांसाठी डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत मिळू शकते.
कोणासाठी आहे योजना
‘Vi’ ची नवीन 169 रुपयांची योजना खास अशा युजर्ससाठी आहे जे कमी डेटा वापरतात आणि त्यांना अधिक दिवसांची व्हॅलिडिटी हवी आहे.
काय आहे इतरांचे 200 रुपयांच्या आतील प्लॅन
‘Jio’ च्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 GB डेटा येतो. तर ‘Airtel’च्या 155 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 300 एसएमएस आणि 1 जीबी डेटा दिला जात आहे.
एअरटेलने ग्राहकांना दिला धक्का, रिचार्ज प्लॅन झाले महाग
दुसरीकडे एअरटेलने मात्र ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपले दोन रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. या दोन्ही प्रीपेड योजना आहेत. Airtel ने 118 रुपये आणि 289 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. हा 4G डेटा व्हाउचर प्लॅन आहे. अशा परिस्थितीत, आता तुम्हाला 118 रुपयांच्या प्लॅनसाठी 129 रुपये मोजावे लागतील तर, 289 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसाठी 329 रुपये दयावे लागतील. हे रिचार्ज प्लॅन एअरटेलच्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर लाइव्ह झाले आहेत.
का वाढले रिचार्ज प्लॅनचे दर
टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, एअरटेलला प्रति युजर्स म्हणजेच एआरपीयूचा (ऍव्हरेज रेव्हेन्यू पर युनिट) सरासरी महसूल वाढवायचा आहे. या कारणास्तव, एअरटेल चांगल्या रिटर्न्ससाठी आपल्या योजनेवर काम करत आहे. या योजनेअंतर्गत एअरटेलने आपल्या दोन प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत.