हायलाइट्स:
- माजी खासदार किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना
- किरीट सोमय्यांना कराड रेल्वे स्थानकात रोखले
- कोल्हापूरातील आजचा संघर्ष तूर्तास टळला
कराडः ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) आज कोल्हापुरात जाण्यास निघाले होते. मात्र, आज पहाटे साडेचारच्या सुमारास कराड पोलिसांनी किरीट सोमय्या यांना ताब्यात घेतलं आहे. कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी सोमय्यांना विनंती केल्यानंतर ते कराड येथे उतरले आहेत.
किरीट सोमय्या काल संध्याकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबई सीएसएमटीहून कोल्हापूरला रवाना झाल्यासाठी निघाले होते. मुंबईतही सोमय्या यांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसनं कोल्हापूरला जाण्यासाठी रवाना झाले होते. कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी विनंती केल्यानंतर सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड येथे उतरले आहेत. सोमय्यांना सध्या कराडच्या सर्किट हाउसवर ठेवण्यात आलं आहे. तसंच, तिथेच सकाळी नऊच्या दरम्यान सोमय्या पत्रकार परिषद घेणार आहेत.
माझे भांडण प्रशासनाशी नाही, त्यामुळे प्रशासन अडचणीत येत असेल तर मी येणार नाही, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. तसंच, पुढील दोन दिवसांनी कोल्हापूरला येणार असल्याची माहितीही त्यांनी दिला आहे. सोमय्यांच्या या निर्णयामुळं कोल्हापुरात होणारा संघर्ष तात्पुरता टळला आहे.
कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश; सोमय्यांना जिल्ह्याच्या सीमेवर रोखले जाईल?
किरीट सोमय्या कोल्हापुरात येणार म्हणून कोल्हापुर रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते जमले होते. तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळं सोमय्यांनी कराड येथे उतरण्याचा निर्णय घेतला. तसंच, किरीट सोमय्यांच्या विरोधात कागल येथे काढण्यात येणारा मोर्चा राष्ट्रवादीने रद्द केला आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेस ठाणे स्थानकात पोहोचली, कार्यकर्त्यांची गर्दी