व्हॉट्सॲप युजर्ससाठी गुड न्युज; आता येईल स्टेटस पोस्ट करण्याची खरी मजा

व्हॉट्सॲपने एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर्स व्हॉट्सॲप युजर्ससाठी खुप उपयुक्त ठरू शकते. आजच्या काळात व्हिडीओजचा ट्रेंड खूप वाढला आहे. लोक मोठया प्रमाणावर मीम्स, इन्स्पीरेशन देणारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करतात. असे बरेचसे व्हिडीओ तुम्ही तुमच्या स्टेटसवरही टाकता, पण व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये व्हिडीओ टाकताना कधी कधी संपुर्ण व्हिडिओ प्ले होत नाही.

आता पोस्ट करा संपूर्ण व्हिडीओ

व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये व्हिडीओ टाकताना कधी कधी संपुर्ण व्हिडिओ प्ले होत नाही याचे कारण म्हणजे व्हॉट्सॲप स्टेटस तुमच्या छोट्या व्हिडिओंना सपोर्ट करते. जर तुमचा व्हिडिओ खूप मोठा असेल तर युजर्स तो स्टेटसवर शेअर करू शकणार नाहीत, पण आता व्हॉट्सॲपने यावर उपाय आणला आहे.

येत आहे नवीन फीचर

Google Play Beta प्रोग्राम अंतर्गत WhatsApp द्वारे नवीन अपडेट आणले जात आहे. यासाठी नवीन आवृत्ती 2.24.7.6 अपडेट देण्यात येत आहे. व्हॉट्सॲपच्या नवीन अपडेटमध्ये युजर्स त्यांच्या स्टेटसवर 1 मिनिटापर्यंतचे व्हिडिओ शेअर करू शकतील. सध्या हे काही बीटा टेस्टर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये शेअर करू शकाल कॉन्टॅक्ट

याशिवाय WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे व्हॉट्सॲप बीटाच्या Android 2.24.6.19 अपडेटमध्ये पाहिले जाऊ शकते. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटसमधील कॉन्टॅक्ट अपडेट करू शकाल. या फीचरमध्ये अशी सुविधाही असेल की, जर एखाद्याचा कॉन्टॅक्ट शेअर केला असेल तर त्याला नोटिफिकेशन मिळेल. युजरची प्रायव्हसी आणि सेफ्टी लक्षात घेऊन ही सूचना देण्यात येणार आहे.
या नवीन फीचर्स बरोबरच अनेकांना माहित नसलेले मेसेज एडिटिंग, व्हिडीओ मेसेज यांसारखे अजूनही काही आकर्षक फीचर्स व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहेत.

मेसेज करा एडिट

जर तुम्ही घाईघाईत व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला आणि तुम्हाला तो बदलायचा आहे, तर तुम्ही व्हॉट्सॲपवरही तेही करू शकता. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज एडिट करण्याची सुविधा मिळते. एखादा मेसेज केवळ १५ मिनिटांपर्यंत एडिट करू शकता आणि जेव्हा मेसेज एडिट केला जातो, तेव्हा समोरच्याला याबद्दल सूचना मिळते.

अनोळखी कॉल करा सायलेंट

WhatsApp वरील अज्ञात व्यक्तींच्या कॉल्समुळे कंटाळलेल्यांसाठी, मेसेजिंग प्लॅटफॉर्मने प्रायव्हसी वाढविण्यासाठी अननोन नंबरवरून कॉल
ऑटोमेटिकली म्यूट करण्याची सुविधा मिळते. ‘म्यूट अननोन कॉल्स’ पर्याय यासाठी एनेबल करावा लागेल.

इन्स्टन्ट व्हिडीओ मेसेज

तुम्ही व्हॉट्सॲपवर एका लहान व्हिडिओसह देखील मेसेजने उत्तर देऊ शकता. हे फीचर युजर्सना मित्र आणि कुटूंबियांशी चॅट करताना लहान व्हिडिओ पाठवण्याची सुविधा देते. मेटाच्या अशा अनोख्या फीचर्समुळे युजर्सना चॅटिंगचा नवीन एक्सपेरिअन्स मिळणार आहे.

Source link

metastatuswhats appमेटाव्हॉट्सॲपस्टेट्स
Comments (0)
Add Comment