वेबसाइट्स तात्काळ ब्लॉक करण्याचा आग्रह
या वेबसाईट्समुळे टेलिकॉम ऑपरेटर्सचे मोठे नुकसान होत असून ग्राहकांनाही धोका निर्माण होऊ शकतो, असे या पत्रात म्हटले आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे सरकारला सांगण्यात आले आहे. असोसिएशनने दूरसंचार विभागाला ही बाब राज्याच्या सर्व सचिवांना कळवण्यास सांगितले आहे. सीओएआयने या वेबसाइट्स तात्काळ ब्लॉक करण्याचा आग्रह धरला आहे.
या वेबसाइटसवर आहे कारवाईची मागणी
सीओएआयने या विदेशी वेबसाइट्स तात्काळ ब्लॉक करण्याची मागणी केली आहे. यामध्ये eBay, Alibaba, Telefly, Seeker816, Dorfatrade या नावांचा समावेश आहे. या वेबसाइट्स टेल्कोच्या सदस्यांकडून चोरीला गेलेले ‘ॲक्टिव्ह इक्विपमेंट्स ‘ विकत असल्याचा आरोप आहे. यामध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे या वेबसाइट्स तात्काळ ब्लॉक करण्यास असोसिएशनने सांगितले आहे. ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. कारण भारतीय टेलिकॉम ऑपरेटर्सची सामग्री चोरीला जात आहे जी कोणासाठीही चिंतेची बाब असू शकते. मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
युजर्सच्या वेबसाईट प्रवेशावर येईल बॅन
जर अशी कारवाई केली गेली तर युजर्स या वेबसाइट्समध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.
ग्राहकांना सर्वाधिक त्रास
दिल्ली एनसीआर, राजस्थान, आसाम, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा या काही विशिष्ट भौगोलिक प्रदेशांमध्ये चोरीच्या घटना प्रमाणापेक्षा जास्त असल्याचेही असोसिएशनने अधोरेखित केले आहे. चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे ग्राहकांना सर्वाधिक त्रास होत आहे. ”या घटनांमुळे साइटद्वारे ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेमध्ये जवळजवळ नेहमीच घसरण होते, परंतु सेवा पूर्णपणे बंद झाल्याची उदाहरणे देखील असू शकतात,” असेही COAI ने पत्रात म्हटले आहे.