चोरी गेलेला फोन ट्रॅक करणे आता सोपे; ‘संचार सारथी’ करेल मदत मोबाईल शोधायला

भारत सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात ‘संचार साथी’ नावाचे व्यासपीठ सुरू केले होते. हे व्यासपीठ सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) प्रणालीने सुसज्ज आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे, युजर्स केवळ त्यांचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधू आणि ट्रॅक करू शकत नाहीत, तर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमचा हरवलेला फोन ब्लॉक करण्याचीही परवानगी देतो. तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे तुमचे डिव्हाइस ब्लॉक केल्यास, इतर कोणतीही व्यक्ती तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकणार नाही. जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल तर हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

सर्वप्रथम तुम्हाला तुमचे चोरी झालेले उपकरण ‘संचार साथी’ प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करावे लागेल. यानंतर तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे तुमचा फोन ट्रॅक करू शकाल. जर तुम्ही अद्याप ‘संचार साथी’ प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला नसेल, तर याठिकाणी हा प्लॅटफॉर्म वापरण्याची स्टेप बाय स्टेप माहिती देत आहोत.

‘संचार साथी’ वर तुमचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल कसे कराल ट्रॅक

पहिली पायरी: सर्वप्रथम ‘संचार साथी’ पोर्टलवर जा. यासाठी तुम्ही https://www.sancharsaathi.gov.in/ वर जाऊ शकता.

दुसरी पायरी: आता तुम्ही खाली स्क्रोल कराल आणि Citizen Centric Services टॅब दिसेल. या टॅबमध्ये तुम्हाला तुमच्या हरवलेल्या/चोरी झालेल्या मोबाईल सेक्शनवर क्लिक करावे लागेल.

तिसरी पायरी: या विभागात तुम्हाला तीन पर्याय दिसतील. यामध्ये ब्लॉक स्टोलन/हरवलेले मोबाईल, अनब्लॉक मोबाईल यांचा समावेश आहे.
आणि चेक रिक्वेस्ट स्टेटसही समाविष्ट केले जाईल.

चौथी पायरी: सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या चोरीला गेलेल्या फोनची माहिती येथे द्यावी लागेल. यासाठी पहिल्या टॅबवर क्लिक करा.

पाचवी पायरी: आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, डिव्हाईसचा ब्रँड, IMEI नंबर, डिव्हाईस मॉडेल, डिव्हाईस इनव्हॉइस, फोन कधी चोरीला गेला, कुठे चोरीला गेला, जवळच्या पोलिस स्टेशनचे नाव, पोलिस तक्रार क्रमांक, तक्रार असे तपशील भरावे लागतील.

सहावी पायरी: सर्व तपशील व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.

तुमच्या हरवलेला/चोरी झालेल्या फोनचा स्टेटस कसा तपासायचा

पहिली पायरी : चोरीला गेलेल्या फोनचे स्टेट्स चेक करण्यासाठी, तुम्हाला संचार साथी ॲपवर फोन ट्रॅक करण्याची सुविधा मिळेल.

दुसरी पायरी: यासाठी तुम्हाला https://ceir.sancharsaathi.gov.in/ वर जावे लागेल आणि त्यानंतर ‘चेक रिक्वेस्ट स्टेटस’ टॅबवर क्लिक करावे लागेल. आता तुमचा रिक्वेस्ट आयडी टाका. यानंतर तुम्ही तुमच्या चोरीला गेलेल्या फोनचे स्टेट्स तपासू शकता.

Source link

mobile trackersanchar saathistolen phoneचोरी गेलेला फोनमोबाईल ट्रॅकरसंचार साथी
Comments (0)
Add Comment