Kirit Somaiya: पोलिसांनी मला चार तास डांबून ठेवले!; घराबाहेर पडताच सोमय्यांनी केला ‘हा’ आरोप

हायलाइट्स:

  • भाजप नेते किरीट सोमय्या अखेर मुलुंडमधून निघाले.
  • गिरगाव चौपाटीवर विसर्जनाला लावली हजेरी.
  • महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरकडे होणार रवाना.

मुंबई:भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सोमय्या यांच्यावर आज दुपारी मुंबई पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली होती. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सोमय्या यांना घराबाहेर जाऊ देण्यात आले आहे. दरम्यान, सोमय्या हे गिरगाव चौपाटीवर दाखल झाले असून तिथे गणेश विसर्जनाला हजेरी लावून ते लगेचच महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरसाठी रवाना होणार आहेत. दरम्यान, सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करणारा आदेश जारी करण्यात आलेला असल्याने संघर्षाचा पुढचा अंक कोल्हापुरात रंगण्याची चिन्हे आहेत. ( Kirit Somaiya Latest Breaking News )

वाचा: किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध; ‘त्या’ नोटीसवरून उठलं मोठं वादळ

किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. त्याला मुश्रीफ यांनीही जोरदार आव्हान दिले आहे. त्यातच सोमय्या यांनी कोल्हापुरात कागल येथे जाऊन प्रत्यक्ष मुश्रीफ यांच्या कारखान्याची पाहणी करण्याचे व अधिक माहिती घ्यायचे ठरवले आहे. त्यावरून मोठं वादळ उठलं आहे. मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले आहेत तर त्याचवेळी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सोमय्या यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश न जुमानता कोल्हापुरात जाण्यावर सोमय्या ठाम आहे.

वाचा: मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी अटकेचे आदेश; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर आरोप

सोमय्या हे आजच महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना होणार आहेत. त्याआधी सोमय्या यांच्या मुंबईतील मुलुंड येथील निवासस्थानी आज दुपारपासून अनेक घडामोडी घडल्या. सोमय्या हे गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जनासाठी जाणार होते. त्याआधीच पोलिसांनी नोटीससह तिथे दाखल होत सोमय्या यांना स्थानबद्ध केले. याबाबत ठाकरे सरकार आणि पोलिसांवर सोमय्या यांनी गंभीर आरोप केला आहे. साधारण सहाच्या सुमारास सोमय्या यांना जाऊ देण्यात आले असून त्यांनी एक ट्वीट करून त्याबाबत माहिती दिली आहे.

वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…

‘ठाकरे सरकारला झुकावे लागले, मी आता गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जनला जात आहे आणि तिथून पुढे अंबेमाईचे आशीर्वादही घेणार’, असे ट्वीट सोमय्या यांनी केले आहे. ‘मला चार तास पोलिसांनी डांबून ठेवले. मात्र, ठाकरे सरकारच्या या दडपशाहीला मी घाबरणार नाही. काहीही झाले तरी मी कोल्हापूरला जाणारच आहे’, असे सोमय्या यांनी गिरगाव चौपाटी येथे माध्यमांना सांगितले आहे. सोमय्या हे आजच महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना होतील. उद्या ते कोल्हापूर येथे पोहचणार असून तिथे मनाई आदेश असल्याने त्यांना पोलीस ताब्यात घेतील अशी शक्यता आहे. त्यामुळे उद्याही याअनुषंगाने मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

वाचा:‘…म्हणूनच माझा आवाज दाबण्याचा चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न आहे’

Source link

kirit somaiya detainedkirit somaiya latest breaking newskirit somaiya latest newskirit somaiya targets thackeray govtkirit somaiya vs hasan mushrifकिरीट सोमय्याकोल्हापूरठाकरे सरकारभाजपहसन मुश्रीफ
Comments (0)
Add Comment