इंस्टाग्रामचा वापर आता फक्त फोटो शेअर करण्यापुरता मर्यादित नाही. रील हे इंस्टाग्रामचे सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्य बनले आहे. Reels द्वारे, युजर्स केवळ लहान व्हिडिओ तयार करून त्यांच्या फॉलोअर्सचे मनोरंजन करत नाहीत तर त्यातून तुम्ही पैसे देखील कमवू शकतात. जर तुमच्याकडच फॉलोअर्सनंबर चांगला असेल आणि तुमच्या रीलला खूप व्ह्यूज मिळत असतील, तर इन्स्टाग्राम तुम्हाला रील व्हिडिओंसाठी पैसे देखील देते.जर तुम्ही इन्स्ट्राग्रामवर नव्यानेच रील, व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात, Reels किंवा व्हिडिओमध्ये तुमचा व्हॉइस ओव्हर कसा रेकॉर्ड करायचा याची माहिती देत आहोत.
इंस्टाग्राम रील्समध्ये कसे जोडाल व्हॉईस ओव्हर
इन्स्टाग्रामवर खेळू शकता गेमही
इंस्टाग्राम रील्समध्ये कसे जोडाल व्हॉईस ओव्हर
रील व्हिडिओमध्ये, तुम्ही म्युजिक आणिसाउंड इफेक्टसह तुमचा व्हॉइस ओव्हर देऊ शकता. विशेष बाब म्हणजे रील व्हिडिओवर व्हॉईस ओव्हर देण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचा सहारा घ्यावा लागणार नाही. Instagram Reels व्हिडिओंमध्ये व्हॉईस ओव्हर रेकॉर्ड करण्यासाठी ॲप-मधील सपोर्ट प्रदान केला जातो. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
- सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Instagram App उघडा.
- यानंतर खालच्या पट्टीवर दिसणाऱ्या + आयकॉनवर क्लिक करा.
- + आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर चार पर्याय दिसतील, ज्यामध्ये पोस्ट, स्टोरी, रील आणि लाईव्हचे पर्याय असतील.
- आता तुम्हाला Reels पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता कॅमेरा स्टार्स करा आणि तुमची रील तयार करा.
- रील रेकॉर्ड केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या रीलच्या कोपऱ्यात म्युझिक आयकॉन दिसेल. या चिन्हावर क्लिक करा.
- म्युझिक आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली काही पर्याय दिसतील, ज्यामध्ये म्युझिक, व्हॉईस ओव्हर आणि साउंड इफेक्ट इ. पर्याय असतील.
- तुम्हाला या तीनपैकी व्हॉईस ओव्हर पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्ही रील व्हिडिओसाठी तुमचा आवाज देऊ शकता.
- व्हॉईस ओव्हर दिल्यानंतर शेअर बटणावर क्लिक करून तुमची रील इंस्टाग्रामवर शेअर करा.
इन्स्टाग्रामवर खेळू शकता गेमही
अलीकडे इन्स्टाग्रामवर एकाच वेळी अनेक फिचर्स जोडण्यात आले आहेत. या फीचर्सच्या आधारे आता आपण इन्स्ट्राग्रामवर गेम देखील खेळू शकता. जाणून घेऊया यासाठीच्या सोप्या स्टेप्स. इन्स्ट्राग्राम आपल्या युजर्सना DM मध्ये गेम खेळण्याची सुविधा देते. यावर तुम्ही एक ‘Pong’ गेम खेळू शकता. यासाठी ,
- कुठल्याही DM चॅटमध्ये जाऊन एक इमोजी सिलेक्ट करा.
- आता त्या ईमोजीवर टॅब करताच एक नवीन स्क्रीन ओपन होईल.
- स्क्रीनवर ईमोजी एका बॉल स्वरूपात दिसेल.
- स्क्रीनच्या खाली एक स्लायडर असेल त्याला तुम्ही मूव्ह करून खेळू शकता.
- स्लायडर सतत मूव्ह करत तुम्हाला स्माईली स्क्रीनवर खाली टच होण्यापासून वाचवायचा असतो.