हायलाइट्स:
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाचा महिलेसोबत धक्कादायक प्रकार
- पोलिसांनी तक्रार घेण्यास एक टाळाटाळ केली पण अखेर गुन्हा दाखल
- पत्रकार परिषद घेतल्याने पोलिसांचे धाबे दणाणले
नांदेड : स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाने आपल्याच संघटनेत असलेल्या प्रदेश उपाध्यक्षाच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघड झाला आहे. काल रात्री नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात माधव देवसरकर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती आहे.
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर असं महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याचं नाव आहे. माधव देवसरकरने सिडको भागातील संघटनेत काम करणाऱ्या एका मित्राच्या पत्नीला डोळा मारणे, फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट वारंवार पाठवून रात्री अपरात्री कॉल करून गैरवर्तन केले आहे.
पतीच्या माध्यमातून देवसरकरला सांगूनही गैरवर्तन थांबले नसल्यामुळे ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. मात्र, देवसरकर हे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे सवस्थापक अध्यक्ष असल्याने ग्रामीण पोलिसांनी तक्रार घेण्यास एक टाळाटाळ केली. अखेर पत्रकार परिषद घेतल्याने मात्र पोलिसांचे धाबे दणाणल्याने आज ग्रामीण पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
दरम्यान, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे राज्य चर्चेत असताना नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या सवस्थापक अध्यक्षाने वाईट उद्देशाने केलेले गैरवर्तन या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तर या महिलेचे सासरे हे आर्मीतील कमांडर होते. त्यांना जिल्ह्यात मोठा मान आहे, समाजातील इतरांवर हा प्रसंग येऊ नये यासाठी आम्ही पुढाकार घेत असल्याचं परिवाराने सांगितले आहे.
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षानेच आपल्याच सहकारी म्हणून संघटनेत प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याने मैत्रीच्या नात्याला काळिमा फासल्याच सकल मराठा संघनेतील कार्यकर्तीमध्ये बोललं जातं आहे.