YouTube वर दिसणार नाहीत जाहिराती; होळीच्या आधी मोफत मिळतेय प्रीमियम मेंबरशिप

जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Youtube वर तुम्ही देखील व्हिडीओज पाहत असाल. मोबाइल अ‍ॅपमध्ये व्हिडीओज पाहत असाल किंवा स्मार्ट टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर, डिवाइस कोणतंही असलं तरी जाहिराती काही चुकत नाहीत. जर तुम्हाला अ‍ॅड-फ्री व्हिडीओज पाहायचे असतील तर Youtube Premium सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. विशेष म्हणजे निवडक युजर्सना अगदी मोफत या सब्सक्रिप्शनचा लाभ घेता येईल.

भारतीय युजर्सना जर युट्युब प्रीमियमचं सब्सक्रिप्शन हवं असेल तर दर महिन्याला १२९ रुपयांचं पेमेंट करावं लागतं. परंतु आता होळीच्या युट्युबनं भारतातील विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर सादर केली आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला अगदी सहज प्रीमियम टियर मेंबरशिप घेता येईल आणि फ्री ट्रायलचा देखील फायदा दिला जात आहे. या ऑफरसाठी तुमच्याकडे स्टुडंट ID असणं आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना मोफत ट्रायल मिळेल

युट्युबनं सांगितलं आहे की जे विद्यार्थी एखाद्या उच्च शिक्षण महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत आणि ज्यांच्या विभागात युट्युब स्टुडंट मेंबरशिप उपलब्ध आहे, ते अगदी मोफत ट्रायल घेऊ शकतात. युट्युब हा स्टुडंट ID आयडेंटिटी व्हेरिफिकेशन प्लॅटफॉर्म SheerID सह व्हेरिफाय करेल आणि त्यानंतर मोफत मेंबरशिपचा फायदा घेता येईल.

तुम्हाला अशाप्रकारे मिळेल फ्री मेंबरशिप

जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबात विद्यार्थी असेल तर या प्रीमियम मेंबरशिपचा फायदा घेता येईल. यासाठी तुम्हाला मोबाइल किंवा PC मध्ये युट्युब प्रीमियम स्टुडंट प्लॅन पेजवर जावं लागेल. तिथे ‘Try it free’ बटनवर टॅप किंवा क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला शाळा, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीच्या नावाची माहिती द्यावी लागेल, त्यानंतर SheerID ही माहिती वेरीफाय करेल.

तुम्ही पात्र ठरलात की तुमच्याकडे इनरोलमेंट नंबर आणि ईमेल ID मागितला जाईल. हा डेटा व्हेरिफाय झाल्यावर तुम्हाला मेंबरशिप मिळेल. या मेंबरशिपचा फायदा ४ वर्ष घेता येईल परंतु त्यानंतर SheerID द्वारे तुम्हाला पुन्हा आयडेंटिटी व्हेरिफाय करावी लागेल.

Source link

free youtube premium membershiphow get free youtube premium membershipyoutube premium membershipयुट्युबयुट्युब प्रीमियम मेंबरशिप
Comments (0)
Add Comment