रुग्णाने केला आनंद व्यक्त
Noland Arbaugh नावाच्या 29 वर्षीय व्यक्तीने व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे की, सुमारे 8 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर त्यांना खांद्याच्या खाली अर्धांगवायू झाला होता.अर्बॉग नंतर म्हणतात की, न्यूरालिंकने त्यांना बुद्धिबळ खेळण्यास सक्षम केले आहे. याआधी आवड असूनही स्वतःहून अशाप्रकारे खेळता येत नव्हते. अशापद्धतीची चिप मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांना जेव्हा पहिल्यांदा या चिपचा पुर्ण कंट्रोल देण्यात आला तेव्हा ते रात्रभर गेम खेळत राहिल्याचा अनुभव ते सांगतात.
एलोन मस्कने पहिल्या न्यूरालिंक युजरच्या व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया
एलोन मस्कनेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि या चिपचे नाव ‘टेलिपॅथी’ असल्याचे उघड केले. ”फक्त विचार करून व्हिडिओ गेम खेळणे.” अशा आशयाचे कॅप्शन मस्क यांनी या व्हिडिओला दिले आहे.
व्हिडिओला अनेक लाईक्स
व्हिडिओला आधीपासूनच 7.4 मिलियनहून अधिक व्ह्यू आहेत आणि हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. अनेक युजर्सनी मस्कच्या पोस्टला रिस्पॉन्स देत न्यूरालिंकच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही युजर्सनी ते इन्स्पायर झाल्याचे सांगितले तर काहींनी याला “अविश्वसनीय” म्हटले आहे.