… म्हणून भाजपचा सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न; सतेज पाटील यांचा आरोप

हायलाइट्स:

  • कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा भाजपवर सरकार अस्थिर करण्याचा आरोप.
  • नारायण राणे मंत्री झाल्यानंतर तीन पैकी एकही पक्ष आपल्या सोबत येणार नाही, याची भाजपला खात्री- सतेज पाटील.
  • त्यामुळेच भाजपचे नेते आता सरकार अस्थिर करण्यासाठी आटापिटा करत आहेत- सतेज पाटील.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रात नारायण राणे मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील तीन पैकी एकही पक्ष आपल्या सोबत येणार नाही, याची खात्री भाजपला झाली. त्यामुळे राज्यात सत्ता असताना पाच वर्षे शांत असणारे भाजपचे नेते आता सरकार अस्थिर करण्यासाठी आटापिटा करत आहेत असा आरोप कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. (Kolhapur Guardian Minister Satej Patil accused the BJP of destabilizing the government)

कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, एखाद्या प्रकरणाची विशिष्ट यंत्रणेकडे तक्रार दिल्यानंतर ती यंत्रणा त्याचा पुढील तपास करते. तेथे तक्रारदाराने सर्वत्र् फिरायची गरज नसते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इडीकडे तक्रार केली आहे. ती यंत्रणा पुढील कार्यवाही करत आहे. अशावेळी सोमय्या कोल्हापुरात येऊन काय करणार आहेत असा सवाल करून ते म्हणाले, ते येथे येऊन काय माहिती घेणार आहेत. तपास यंत्रणा माहिती घेईल ना. येथे येऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची काय गरज आहे. गणेश विसर्जनात सर्व पोलिस यंत्रणा व्यस्त आहे. अशावेळी त्यांना बंदोबस्त देणे अशक्य होते.त्यामुळेच त्यांना जिल्हाबंदी करण्याचा आदेश प्रशासनाला काढावा लागला.

क्लिक करा आणि वाचा- सोमय्यांचे मुंबईत जंगी स्वागत; ठाकरे सरकारला दिले ३१ डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम

ते म्हणाले, केंद्रात राणे मंत्री झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आपल्या सोबत येणार नाही हे स्पष्ट झाले. तेव्हापासून उगाचच राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आटापिटा करत आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पाच वर्षे त्यांचीच राज्यात सत्ता होती. तेव्हा गुन्हे का बाहेर काढले नाहीत. आताच कशासाठी हा आटापिटा सुरू आहे. पाच वर्षे गुन्हा लपवणे हादेखील गुन्हाच आहे.

क्लिक करा आणि वाचा- मनसेचे खळ्ळ-खट्याक; संतप्त कार्यकर्त्यांनी भिवंडी-ठाणे मार्गावरील टोल नाका फोडला
क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! जळगाव जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू; सख्खे भाऊ आणि चुलत भाऊ-बहिणीचा समावेश

Source link

bjpSatej Patilसतेज पाटीलसतेज पाटील पालकमंत्रीसतेज पाटील यांचा भाजपवर आरोप
Comments (0)
Add Comment